प्रतिनिधी /पणजी
आझादी का अमृत महोत्सवा निमित्त लोकमान्य राष्ट्रोत्सव ठेव योजना 01 ऑगस्ट 2022 पासून सुरू झाली असून योजनेचा शेवटचा दिवस 31 ऑगस्ट 2022 आहे . भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे झाल्या निमित्त ही योजना सुरु केली आहे.ठेवीची किमान रक्कम रु.75000/- आणि त्यानंतर रु75000/-च्या पटीत आहे, ठेवीची मुदत 750 दिवस. (2वर्षे आणि 20 दिवस) इतकी आहे.व्याज दर 9.75 ज्ञ् असून दर तिमाहीत व्याज दिले जाईल.योजनेच्या इतर अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहेत.ही ठेव योजना केवळ सदस्यांसाठीच उपलब्ध आहे. पाल्यांच्या नांवे सुद्धा ह्या योजनेत भाग घेण्याची सोय आहे पण पालकांनी संस्थेचे सभासद असणे गरजेचे आहे. ठेव रकमेच्या 90ज्ञ् पर्यंत कर्ज सोय उपलब्ध आहे. मुदत पूर्व ठेव काढायची पण मुभा आहे.अधिक माहिती साठी लोकमान्य मल्टिपर्पज को -ऑप सोसायटी च्या नजीकच्या शाखेत संपर्क साधावा.