प्रतिनिधी /बेळगाव
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दि. 4 मे 2022 पासून रेपो दरात वाढ केल्याने काही बँकांनी आपल्या लघु मुदत ठेव योजनेत व्याज दरवाढ केली आहे. याच अनुषंगाने लोकमान्य सोसायटीने लघु मुदत योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे. ही वाढ दि. 9 मे 2022 पासूनच्या ठेवींवर लागू आहे. लोकमान्य सोसायटी सहकार क्षेत्रात आकर्षक व्याज देण्यात आघाडीवर आहे. लोकमान्यमधील विविध गुंतवणुकीवर सभासदांना सर्वोत्तम आणि सुरक्षित परतावा मिळतो. 6 महिने ते 1 वर्ष मुदत ठेव योजनांवर 0.25 टक्के व्याजदर अधिक करण्यात आले आहेत. 1 वर्ष 1 दिवस ते 2 वर्षांच्या आतील मुदत ठेव योजनांवर 0.35 टक्के व्याजदर अधिक करण्यात आले आहेत. ज्ये÷ नागरिकांसाठी 0.50 टक्के अधिक व्याजदर दिला जातो.
सुमारे 10 लाखांहून अधिक समाधानी ग्राहक ही संस्थेला लोकांकडून मिळालेली लोकमान्यता आहे. 213 शाखांचे विस्तीर्ण जाळे पसरलेली व ग्राहकांना विनम्र सेवा देणारी लोकमान्य सोसायटी भारतातील अग्रेसर सहकारी संस्था आहे. नवीन आर्थिक वर्षात लोकमान्य सोसायटीने आपल्या ग्राहकांसाठी नवीन योजना व सेवादेखील चालू केल्या आहेत. अधिक माहितीसाठी लोकमान्य सोसायटीच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधवा किंवा टोल फ्री क्रमांक 18002124050 वर संपर्क करावा.