माझा वेंगुर्ला व लोकमान्य सोसायटीतर्फे दि. 23 जुलै रोजी रानभाजी व पाककृतीचे आयोजन
वार्ताहर / वेंगुर्ले
पावसाळय़ात उगवणाऱ्या दुर्मिळ रानभाज्यांचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी माझा वेंगुर्ला आणि लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी, शाखा वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 23 जुलै रोजी दुपारी 2.30 ते सायंकाळी 6 या वेळेत पाटकर हायस्कूल नजीकच्या स्वामिनी मंडपम हॉलमध्ये प्रदर्शनात्मक रानभाजी पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
माझा वेंगुर्ला आणि लोकमान्य सोसायटी तर्फे या वर्षी हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या गृहिणी, महिला बचत गट, निसर्गप्रेमी स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी दि. 22 जुलैपर्यंत 02366-263049 या क्रमांकावर सकाळी 10 ते 5 वाजेपर्यत करावी. नोंदणी शिवाय स्पर्धेत सहभाग दिला जाणार नाही. नोंदणी केलेल्या पहिल्या 60 स्पर्धकांना स्पर्धेसाठी पात्र ठरविले जाईल. या स्पर्धेत प्राधान्याने नोंदणीने सहभागी झालेल्या स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तु देण्यांत येणार आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप.सोसायटी, शाखा वेंगुर्ले संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.