सावंतवाडी
मागच्या आठवड्यात मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी प्रमुख आरोपी असलेला शिल्पकार जयदीप आपटे फरार असून गेल्या आठ दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत, मात्र त्याचा थांगपत्ता लागलेला नाही.सिंधुदुर्ग पोलिसांनी अखेर त्याच्या विरूद्ध आज लूक आऊट नोटीस जारी केली आहे.