मुत्यानट्टी येथील दरोडेखोरांचे कृत्य, एकाला अटक : हिरेबागेवाडी पोलिसांची कारवाई : 20 दिवसानंतर घटना उघडकीस
प्रतिनिधी /बेळगाव
वनविभागाच्या निवृत्त अधिकाऱयाची कार अडवून त्याला पिस्तुल व तलवारीची धाक दाखवून 4 लाख रुपये लुटण्यात आले आहे. तब्बल 20 दिवसानंतर ही घटना उघडकीस आली असून हिरेबागेवाडी पोलिसांनी दरोडेखोरांच्या टोळीतील एकाला अटक केली आहे. बेळगावहून धारवाडला जाताना हिरेबागेवाडी टोलनाक्मयापासून सुमारे दीड कि.मी. अंतरावर ही घटना घडली होती.
गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या मार्गदर्शनाखाली हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. या टोळीतील आणखी चौघेजण फरारी असून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी जाळे विणले आहेत. या टोळीतील गुन्हेगार मुत्यानट्टी परिसरातील असल्याचे उघडकीस आले आहे.
उपलब्ध माहितीवरुन रविवार दि. 31 जुलै रोजी रात्री ही घटना घडली आहे. घटनेनंतर 10 ते 15 दिवस उलटले तरी संबंधितांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली नव्हती. निवृत्त वन अधिकाऱयाचा कार चालकच फितूर होता. मुत्यानट्टी परिसरातील गुन्हेगारांना हाताशी धरुन मोठी लुट करण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे.
गेली 15 वर्षे बेळगाव येथे वन विभागात सेवा बजावलेले एक अधिकारी निवृत्त झाले आहेत. धारवाडहून रेल्वेने मंडय़ाला जाण्यासाठी 31 जुलै रोजी रात्री ते कारने धारवाडला निघाले होते. ही माहिती त्याच्या कार चालकाने मुत्यानट्टी येथील दरोडेखोरांना आधीच कळविली होती. निवृत्त अधिकारी प्रवास करीत असलेली कार हिरेबागेवाडी टोलनाका ओलांडल्यानंतर चालकाने दरोडेखोरांना सिग्नल दिला.
टोलनाक्मयापासून दीड कि.मी. अंतरावर अधिकाऱयाच्यी कार अडविण्यात आली. पिस्तुल तलवारीची धाक दाखवून 20 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. त्यावेळी या अधिकाऱयाकडे चार लाख रुपये होते. गुन्हेगारांनी ही रक्कम हिसकावून घेतली. 20 लाख रुपये दिले नाही तर तुझी सुटका करणार नाही, असे धमकावण्यात आले होते.
दरोडेखोरांना फितूर असलेल्या कार चालकाने आपल्यालाही दरोडेखोरांनी मारहाण केल्याचा आव आणला होता. या संबंधी फिर्याद दाखल करण्यात आली नव्हती. एका अपघात प्रकरणाच्या तपासाच्यावेळी हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर यांना दरोडय़ाची माहिती मिळाली. स्कॉर्पिओवरील लोगोवरुन पोलिसांनी दरोडेखोरांची माहिती मिळविली असून एकूण पाचजणांनी हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे.
पिस्तुल की लायटर
दरोडेखोरांनी निवृत्त वन अधिकाऱयाच्या कपाळावर रोखलेली पिस्तुल खरी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ते लायटर असल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आली असून उर्वरित चौघांना अटक केल्यानंतरच याचा उलगडा होणार आहे. हिरेबागेवाडी पोलिसांच्या या कारवाईचे पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी कौतुक केले आहे.