Tarun Bharat

गर्लगुंजीत श्रीकृष्ण मंदिराचा उद्या लोर्कापण सोहळा

Advertisements

प्रतिनिधी /खानापूर

गर्लगुंजीतील श्रीकृष्ण मंदिर-बाल विकास केंद्राचा वास्तुशांती व कळसारोहण सोहळा रविवार दि. 7 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता करण्यात येणार आहे. गावात सांस्कृतिक उपक्रम राबवण्याबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने श्रीकृष्ण मंदिरामध्ये बालविकास केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.

 गावातील सरकारी मराठी मुलांची शाळा ढासळल्यामुळे दोन वर्ग या मंदिरात भरवण्यात येत आहेत. या मंदिराचे बांधकाम देणगीदारांच्या सहकार्यातून पूर्ण झाले असून या मंदिराचा कळसारोहण कार्यक्रम रविवारी होणार आहे. या कार्यक्रमाला देणगीदार व हितचिंतक, गावकऱयांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीकृष्ण मंदिर व्यवस्थापन कमिटीने केले आहे.

भविष्यात मुलांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविणार

मंदिराच्या खालच्या सभागृहामध्ये नामस्मरण, भजन, कीर्तन, गोकुळाष्टमी, तुळशी विवाह असे कार्यक्रम गेली 6 वर्ष सतत चालू आहेत. वरचे सभागृह हे मुलांच्या शैक्षणिक विकासासाठीच वापर करण्याचा हेतू आहे. शिक्षण तज्ञांची मदत घेऊन भविष्यामध्ये मुलांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. तसेच शेतकऱयांना देखील मार्गदर्शन करण्यासाठी या सांस्कृतिक केंद्राचा उपयोग करण्यात येणार आहे. या मंदिराला सदानंद पाटील 2.5 लाख रु., शोभा सदानंद पाटील 2.5 लाख, परशराम चौगुले 25000 रु., विठ्ठल हलगेकर तोपिनकट्टी 25000, प्रवीण देसाई हलशीवाडी 25000, अजित पाटील पुणे 25000, दीपक नार्वेकर 25000, राजू सिद्धाणी 25000 रुपये तसेच इतर अनेक देणगीदारानी यास हातभार लावलेला आहे. यातून हे बाल विकास केंद्र उभारण्यात आले आहे, असे मंदिर व्यवस्थापन कमिटीने कळविले आहे. मंदिर उभारणीसाठी सदानंद पाटील चंद्रकांत पाटील, नारायण चौगुले, अर्जुन सिद्धाणी, अरुण भातकांडे, केदारी यल्लारीचे, मारुती पाटील, गंगाधर भातकांडे, रोहित पाटील, यांच्या व्यवस्थापनाखाली मंदिराचे निर्माण झाले असून भविष्यात मंदिराच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प सोडण्यात आलेला आहे. 

Related Stories

लॉकडाऊन काळात बांधकाम क्षेत्राला मुभा

Rohan_P

येळ्ळूरच्या नवनिर्वाचित ग्रा.पं.सदस्यांची तरुण भारतला भेट

Amit Kulkarni

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ज्योती व्होसट्टीला रौप्य

Amit Kulkarni

जिह्यातील आणखी 38 जण कोरोनामुक्त

Patil_p

आता सर्वच बसमध्ये ट्रव्हल कार्ड

Amit Kulkarni

तिसऱया रेल्वेगेटवर सर्वाधिक लांबीचा स्पॅन

Amit Kulkarni
error: Content is protected !!