Tarun Bharat

उचगाव गणपत गल्लीत पावसामुळे घर कोसळून तीन लाखाचे नुकसान

Advertisements

वार्ताहर/ उचगाव

गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या वाऱयाच्या तडाख्याने आणि मुसळधार पावसाच्या माऱयामुळे उचगाव येथील गणपत गल्लीतील जयश्री महादेव कोळी यांचे राहते घर कोसळून अंदाजे तीन लाखाचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. त्यामुळे सदर कुटुंब सध्या उघडय़ावर पडले आहे.

घटनेची अधिक माहिती अशी, जयश्री महादेव कोळी यांचे कुटुंब अगदी छोटय़ाशा दोन खोल्या असलेल्या घरामध्ये वास्तव्य करून राहते. मात्र याच घराचा समोरील भाग मुसळधार पावसाच्या तडाख्याने कोसळल्याने सदर कुटुंबावरील छत्र उडून गेले आहे. त्यामुळे या घरामध्ये कसे राहावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. सदर कुटुंब हे गरिबीमध्ये कसेबसे संसार चालवत होते. या कुटुंबाला शासनाने तातडीने आर्थिक मदत करून नवीन घर उभारणीसाठी मदत करावी, अशी मागणी या कुटुंबाने तसेच नागरिकांनी केली आहे.

Related Stories

सप्तसूर संगीत विद्यालयातर्फे उद्या संगीत कार्यक्रम

Amit Kulkarni

यमनापूर, गौंडवाड रस्त्यावर बिनधास्त भाजीविक्री

Amit Kulkarni

पाईपलाईन रोडवर सांडपाण्याची समस्या

Omkar B

विद्यार्थ्यांना जुना पास-शुल्क पावती दाखवून करता येणार प्रवास

Amit Kulkarni

विजयनगर येथील नागरिकांनी आमदारांसमोर मांडल्या व्यथा

Amit Kulkarni

उच्च शिक्षित युवक करतोय देशी गो-पालन!

Amit Kulkarni
error: Content is protected !!