Tarun Bharat

‘एलियन’शी प्रेमसंबंध

एलियन्स अर्थात परग्रहावरील मानव पृथ्वीवर दिसल्याच्या कथा रंगवून सांगितल्या जातात. शास्त्रज्ञांच्या मते परग्रहावरील मानव पृथ्वीवर आल्याची घटना आजवर कधीही घडलेली नाही. तरीही त्यांना पाहिल्याची चर्चा होत राहते. एलियन्स पृथ्वीवर येतात किंवा नाही, याविषयी निश्चित सांगता येत नसले तरी ब्रिटनमधील एक युवती चक्क अशा एलियनच्या प्रेमात पडलेली आहे. अब्बीबेला असे तिचे नाव असून एलियन्स पृथ्वीवरील पुरुषांपेक्षा चांगले असतात, असे तिचे मत आहे. एलियन्सनी तिच्या बेडरुममधून अपहरण केले होते, असेही ती सांगते.

अब्बीबेला ही एक अभिनेत्री आहे. परग्रहावरील मानवाशी आपले अनेकदा शरीरसंबंध आले असून आपण त्यांच्या प्रेमात पडले आहे, असे ती धडधडीत सांगते. एका बाहुल्याच्या स्वरुपात हा एलियन आपल्याला दिसतो. तो आपल्याशी बोलतो. आपल्यावर प्रेम करतो आणि आपल्याला समाधानी करतो, अशी विविध आश्चर्यकारक विधाने तिने केली आहेत. या एलियन्सकडे मानवापेक्षाही आधुनिक स्वरुपाचे तंत्रज्ञान आहे, असेही तिचे म्हणणे असते.

Advertisements

तिला असे भास होत असावेत आणि हे मनोवैज्ञानिक प्रकरण आहे, असे मानसोपचार तज्ञ म्हणतात. अवतीभवतीच्या परिस्थितीमुळे काही वेळा माणूस निराश होतो आणि तशा अवस्थेत तो कल्पनाविश्वात रमतो. त्यातूनच त्याला काही वेळा कल्पनाविश्वातील घटना प्रत्यक्षात घडतात, असे वाटते. ही अवस्था पराकोटीला पोहोचल्यास तो अशा बाबी दुसऱयांना सांगू लागतो, असे अनेक मानसोपचार तज्ञांचे म्हणणे या अभिनेत्रीसंदर्भात आहे.

Related Stories

भारतासह 30 देशांना कोरोना विषाणू संसर्गाचा सर्वाधिक धोका

Patil_p

तुर्कस्तानला अमेरिकेकडून निर्बंधांची धमकी

Patil_p

पाकिस्तानात कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 13 हजार 702 वर

Rohan_P

दहशतीत पाकिस्तान, कारवाईची भीती

Patil_p

कार पार्किंगमध्ये वॉर्ड

Patil_p

युरोपमध्ये 20.5 लाखांहून अधिक बाधित

Patil_p
error: Content is protected !!