Tarun Bharat

Solapur; प्रेमी युगलांनी घेतला एकाच ओढणीने गळफास; तरुणाचा मृत्यू तर मुलगी अत्यावस्थ

Advertisements

अक्कलकोट प्रतिनिधी

अक्कलकोट तालुक्यातील एका गावात चिंचेच्या झाडाला प्रेमी युगल अज्ञात कारणाने गळफास घेण्याचा प्रयत्न केला त्यात तरुणाचा गळफासने मृत्यू झाला तर मुलगी मात्र वाचली आहे. ही घटना सकाळी १० च्या सुमारास उघडकीस आली. भीम लक्ष्मण जाधव वय १८ वर्षे असे मयत तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात चिंचेच्या झाडाला प्रेमी युगुलांनी ओढणीच्या साहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ओढणी निसटून हे दोघेही झाडाखाली पडलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यामध्ये भीम लक्ष्मण जाधव या तरुणाचा गळफास ने जागेवरच जीव गेला होता त्यामुळे उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. मात्र सोबतची मुलगी मात्र बचावली असून तिच्यावर उपचार चालू आहेत. अशी फिर्याद तरुणाच्या मामांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ महादेव चिंचोळकर हे करीत आहेत.

Related Stories

घरातून दीड लाखाचे दागिने चोरल्याची तक्रार

Patil_p

सरकारने हिंदू मंदिरं हडपली; मंदिरांच्या सरकारीकरणावर सुब्रमण्यम स्वामींची टीका

Archana Banage

अतिक्रमणमुक्त जमीन शेतकऱ्यांना लिलावाने भाडेतत्वावर, शिंदेवाडी ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम

Archana Banage

हातकणंगले तालुक्यात रासायनिक खतांचा तुटवडा :खतांचा पुरवठा करण्याची मागणी

Archana Banage

मावळ्यांनो गडसंवर्धनाच्या कामाला लागा

datta jadhav

34 हजार 184 कोवीडशिल्ड डोस सोलापुरात दाखल

Archana Banage
error: Content is protected !!