Tarun Bharat

LPG सिलिंडर 265 रुपयांनी महागला

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून व्यावसायिक वापराच्या 19 किलो गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 265 रुपयांची वाढ केली आहे. या दरवाढीने छोटय़ा व्यावसायिकांचे कंबरडे मोडणार असून, त्यांच्याकडून खाद्यपदार्थांच्या किंमती वाढवल्या जाण्याची शक्यता आहे.

नव्या दरवाढीनुसार मुंबईत 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर 1950 रुपये झाला आहे. यापूर्वी तो 1683 रुपयांना मिळत होता. चेन्नईत या सिलिंडरची किंमत 2133 रुपये तर कोलकात्यात 2073.50 रुपये झाली आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापरासाठीच्या 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ केलेली नाही. दिल्लीत 14.2 किलोच्या विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 899.50 रुपयांवर कायम आहे.

Related Stories

‘आप’चे आमदार अमानतुल्ला खान यांना जामीन

Patil_p

शिवसेना खासदारांची कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Abhijeet Khandekar

उद्योगांसाठी सरकारच्या पायघडय़ा

Patil_p

मोठी बातमी : कोरोनामुळे आयपीएल स्थगित;बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांची घोषणा

Archana Banage

विमानतळ मुंबईमध्येच आहे …. आम्हाला डीवचण्यासाठी ‘गरबा’ कराल तर …; मनसेचा इशारा

Archana Banage

शिवसेना नेत्याची गोळय़ा घालून हत्या

Patil_p