ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
नवीन वर्षात गॅस कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर आजपासून 102 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय गॅस कंपन्यांनी घेतला आहे.
नवीन दरानुसार आजपासून दिल्लीत 2101 रुपयांना मिळणारा 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर 1998.5 रुपयांना मिळेल. चेन्नईत हा सिलिंडर 2131, मुंबईत 1948.50 तर कोलकातामध्ये 2076 रुपयांना मिळेल.
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कपात नाही
नवीन वर्षात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत आणि मुंबईत घरगुती गॅस सिलिंडर 900 रुपयांना मिळतो. पुण्यात 909, चेन्नईत 916, कोलकात्यात 926, लखनऊमध्ये 938 रुपयांना मिळत आहे.