ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पेट्रोलिय कंपन्यांनी आजपासून व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलिंडरच्या दरात 250 रुपयांनी वाढ केली आहे. घरगुती वापरासाठीच्या सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही.
दरवाढीमुळे मुंबईत 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 2,205 रुपयांवर पोहोचला आहे, याआधी तो 1,955 रुपये होता. दिल्लीमध्ये याच गॅस सिलिंडरची किंमत 2,253 रुपयांवर पोहोचली आहे. 1 मार्च रोजी तो 2,012 रुपये होता, 22 मार्च रोजी जेव्हा या दरात घसरण झाली होती, त्यावेळी त्याची किंमत 2,003 रुपयांवर पोहोचली होती. कोलकात्यात या सिलिंडरसाठी 2351 रुपये, तर चेन्नईत 2406 रुपये मोजावे लागणार आहेत.
मागील दोन महिन्यांत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 346 रुपयांची वाढ झाली आहे. 1 मार्चला 105 रुपयांची वाढ झाली होती. 22 मार्चला सिलिंडर 9 रुपयांनी स्वस्त झाला होता. दरम्यान, या दरवाढीमुळे हॉटेल, रेस्टॉरंटमधील खाणं महागणार आहे.