ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
रशिया-युक्रेन युद्धाने जागतिक कमोडिटी बाजारात नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे इंधनाच्या आयातीवरील खर्च वाढला असून, पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या दरात वाढ केली आहे.
आजपासून पेट्रोलियम कंपन्यांनी वाणिज्य वापरातील 19 किलोच्या एलपीजी गॅसच्या दरात 105 रुपयांची वाढ केली. तर 5 किलोच्या एलपीजी सिलिंडरमध्ये 27 रुपयांची वाढ केली आहे. विना सब्सिडीवाल्या 14 किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ झाली नाही. त्यामुळे तूर्त कोटय़वधी घरगुती ग्राहकांना दिलासा मिळाला आहे तर व्यावसायिकांना मात्र दरवाढीचा भार सोसावा लागणार आहे.
दरवावाढीनंतर नवी दिल्लीत 19 किलोचा वाणिज्य वापरातील गॅस सिलिंडर 2012 रुपयांना झाला आहे. तर 5 किलो सिलिंडरचा दर 569 रुपये आहे. मुंबईत 19 किलोच्या सिलिंडरचा दर 1962 रुपये, चेन्नईत 2185.5 रुपये झाला आहे. तर कोलकात्यात 19 किलोच्या सिलिंडरसाठी 2089 रुपये मोजावे लागणार आहेत.