ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मार्चच्या सुरूवातीलाच पेट्रोलियम कंपन्यांनी नागरिकांना मोठा झटका दिला आहे. 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची तर 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडर आता 1103 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत हा सिलिंडर 1102.50 रुपये, कोलकात्यात 1129, तर चेन्नईत 1118.50 रुपयांना मिळेल.
दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर 2119.50 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत 2071.50, कोलकाता 2221.50, तर चेन्नईत 2268 रुपयांना मिळेल.