Tarun Bharat

LPG rate Hike: घरगुती गॅस २५ रुपयांनी महागला!


नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

कोरोना आणि वाढती महागाई यामुळे सर्वसामान्यांना जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता पुन्हा एकदा सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. पेट्रोलियम कंपनींनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. विना सबसिडी सिलिंडरची किंमत २५ रुपयांनी वाढवली आहे. दिल्लीमध्ये १४.२ किलोग्रॅम एलपीजी सिलिंडर आता ८५९.५ रुपये झाला आहे. तर यापूर्वी दिल्लीत १४.२ किलोग्रॅम एलपीजी सिलिंडरची किंमत ८३४.५० रुपये होती. १ जुलैला एलपीजी सिलिंडरची किंमत २५.५० रुपयांनी वाढवली होती.

२०२१ च्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीत दिल्लीत एलपीजी सिलेंडरची किंमत ६९४ रुपये होती, जी फेब्रुवारीमध्ये वाढून ७१९ रुपये प्रति सिलेंडर करण्यात आली. १५ फेब्रुवारीला पुन्हा किंमत वाढून ७६९ रुपये करण्यात आली. यानंतर, २५ फेब्रुवारी रोजी एलपीजी सिलेंडरची किंमत कमी होऊन ७९४ रुपये झाली. मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत ८१९ रुपये करण्यात आली. एप्रिलच्या सुरुवातीला १० रुपयांची कपात केल्यानंतर दिल्लीत घरगुती एलपीजीची किंमत ८०९ रुपयांवर गेली होती. एका वर्षात एलपीजी सिलेंडरच्या किमतीत १६५.५० रुपयांची वाढ झाली आहे. तर डिसेंबरपासून आतापर्यंत सिलिंडरच्या किमतीत सुमारे २७५ रुपयांनी वाढ झाली आहे.

यावर्षीच्या सुरुवातीपासून मुंबईत एलपीजी सिलिंडरचे दर वाढतच गेले आहेत. आठ महिन्यात तब्बल १६५ रुपयांनी वाढला आहे. जानेवारीपासून ते ऑगस्टपर्यंत फक्त तीन महिन्यात एलपीजीचे दर स्थिर होते. त्यानंतर मग पुन्हा एकदा एलपीजी सिलिंडराच्या दरात वाढ होऊ लागली. 

Related Stories

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 65 हजारांवर

datta jadhav

दुसरा मजला नसलेले अनोखे गाव

Patil_p

येत्या शैक्षणिक वर्षात फी वाढ नाही : शालेय शिक्षण विभागाकडून आदेश

Tousif Mujawar

राजस्थानमध्ये 772 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar

योगी सरकारकडून पात्र विद्यार्थांना दिला जाणार लॅपटॉप

Tousif Mujawar

धावत्या बसला आग, पाच जण मृत्यूमुखी

Patil_p