बेंगळूर
लार्सन ऍण्ड इन्फोटेक (एलटीआय) आपल्या 12,000 कर्मचाऱयांना मायक्रोसॉफ्ट तंत्रज्ञानावर आधारीत प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे. यावेळी एलटीआयने घोषणा केली आहे, की ते मायक्रोसॉफ्टसोबतचे सहकार्य सुरु ठेवणार आहेत. याची मदत घेत ते उच्च मूल्य क्लाउड सोल्यूशन्स विकसित करण्यावर भर देणार आहेत.
सदरच्या उपक्रमांसाठी भागीदारीअंतर्गत एलटीआयने एक मायक्रोसॉफ्ट व्यवसाय युनिट लाँच केले आहे, जे एंड-टू-एंड डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन्स विकसित करणार आहे. या भागीदारीच्या अंतर्गत एलटीआय 2024 पर्यंत विविध मायक्रोसॉफ्ट तंत्रज्ञानावर आधारीतच आपल्या जवळपास 12,000 व्यावसायिकांना प्रशिक्षण देणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले आहे.