ऑनलाईन टीम / तरुण भारत :
लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमचा प्रमुख वेलुपिल्लई प्रभाकरन जिवंत आहे. योग्य वेळ आल्यावर तो सर्वांसमोर येईल, असा दावा वर्ल्ड कॉन्फेडरेशन ऑफ तामिळचे अध्यक्ष पी नेदुमारन यांनी केला आहे. नेदुमारन यांच्या या धक्कादायक दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.
पी नेदुमारन यांनी तमिळनाडूच्या तंजावरमध्ये एक निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 2009 मध्ये श्रीलंकन लष्कराने लष्करी कारवाई सुरू केली होती, ज्यात प्रभाकरन मारला गेल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रभाकरन जिवंत आहे. तो योग्य वेळ आल्यावर सर्वांसमोर येईल. आपण प्रभाकरनच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. प्रभाकरन लवकरच तमिळ वंशाच्या मुक्तीसाठी योजना जाहीर करणार आहे. जगातील तमाम तमिळ जनतेने संघटित होऊन त्याला पाठिंबा द्यावा, तामिळनाडू सरकार आणि पक्षांनीही त्याच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहनही नेदुमारन यांनी केले आहे.
अधिक वाचा : पुण्यातील गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी