Tarun Bharat

जिल्हय़ात लम्पिस्कीनचा धोका वाढला

Advertisements

429 जनावरांना लागण : काही ठिकाणी रोग आटोक्मयात आल्याने समाधान

प्रतिनिधी / बेळगाव

जिल्हय़ात लम्पिस्कीन संसर्गाचा धोका पुन्हा वाढला आहे. आतापर्यंत 60 गावांमधील 429 जनावरांना लम्पिस्कीनची लागण झाली आहे. तर 21 जनावरांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे रोग नियंत्रणात येत असला तरी दुसरीकडे लागण होणाऱया जनावरांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शेतकऱयांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दरम्यान पशुसंगोपनमार्फत प्रतिबंधक लसीकरणावर भर दिला जात आहे. तसेच प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंगोपनने दिलेल्या उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

जिल्हय़ात 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गो-वर्गीय जनावरांना या रोगाची अधिक लागण झाली आहे. बेळगाव तालुक्मयातील 429 जनावरांना या रोगाची लागण झाली आहे. त्यामध्ये 427 गाय, बैल आणि दोन म्हशींचा समावेश आहे. तर सौंदत्ती तालुक्मयात 21 जनावरांना लागण झाली आहे. त्यामध्ये 20 गायी आणि बैल तर एका म्हशीचा समावेश आहे. जिल्हय़ात केवळ बेळगाव आणि सौंदत्ती तालुक्मयात या रोगाचा फैलाव वाढला आहे. त्याठिकाणी उपचारासाठी रॅपिड अक्शन पथकाची निर्मिती केली आहे. आतापर्यंत लागण झालेल्या जनावरांमध्ये 50 हून अधिक जनावरे लम्पीमुक्त झाली आहेत. शिवाय बरी होणाऱया जनावरांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पशुसंगोपनाला दिलासा मिळाला आहे. तालुक्मयातील पूर्व भागामध्ये या रोगाचा झपाटय़ाने प्रसार झाला आहे. त्यामुळे 21 जनावरे दगावली आहेत. यामध्ये बैलांची संख्या अधिक आहे. त्यामुळे बैल दगावलेल्या शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे. अनेक शर्यती गाजविणारा मुतगा येथील नगऱया बैलदेखील या आजाराचा शिकार झाला. परिणामी शेतकऱयांची चिंता पुन्हा वाढली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शेतकऱयांनी या आजाराची लक्षणे दिसताच तातडीने बाधित जनावर स्वतंत्र करून पशुसंगोपन खात्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Stories

आता राजहंसगडावरही पर्यटकांना बंदी

Rohan_P

चेकपोस्टची आचारसंहिता नोडल अधिकाऱयांकडून पाहणी

Patil_p

पाच महापुरुषांचे पुतळे उभारणार

Patil_p

व्यवसाय परवान्याकरिता ‘ई-छावणी’ प्रणालीद्वारे अर्ज करण्याचे आवाहन

Patil_p

मनपा गाळय़ांची सुनावणी शुक्रवारी

Amit Kulkarni

नंदगड एपीएमसी अध्यक्षांवर अविश्वास ठराव संमत

Amit Kulkarni
error: Content is protected !!