प्रतिनिधी/ सातारा
राज्यातील जळगाव ,अहमदनगर, अकोला, धुळे या जिल्हय़ापाठोपाठा आता जनावरांमध्ये उदभवणाऱया लंपी या आजाराने सातारा जिल्हय़ात ही शिरकाव केला आहे. जिल्हय़ात एकुण 11 जणावरे ही या आजाराने बाधित अढळुन आली असल्याने, पशुविभागातर्फे सतर्कतेचा ईशारा दिला आहे. त्याचबरोबर घाबरून न जाता आपल्या जनावरांमध्ये या रोगाबाबत कोणतीही लक्षणे आढल्यास त्वरीत जवळील पशुविभागीय कार्यालयास संपर्क करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच लवकरात लवकर आपल्या जणावरांचे लसीकरण करून घ्यावे, असेही सुचित करण्यात आले आहे.
सध्या कराड येथील वाघेरी, सातारा तालुक्यातील महागाव व पांढरवाडी, फलटण तालुक्यातील फडतरेवस्ती, मडकरवस्ती, खमगाव आदी भागातील जनावरांमध्ये ‘लंपी’ आजाराची लक्षणे आढळुन आली आहेत. या जनावरांचे नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. लक्षणे आढळुन आलेल्या जनावरांच्या भागातील जवळपास पाच किलोमिटर परिसर सुरक्षित ठेवण्यात आला आहे. या जनावरांचे योग्य प्रकारे विलगीकरण ही करण्यात आले आहे.
लंपी त्वचा रोग हा गाई-म्हशींमध्ये होणारा विष्णुजन्य आजार असून या आजारात जनावरास प्रथम तीव्र स्वरुपाचा ताप येतो त्यानंतर डोळ्यातून पाणी व नाकातून स्त्राव येणे सुरु होते. लसीकाग्रंथींना सुज येते, जनावराची भुक मंदावून दुध उत्पादन कमी होते. जनावराचे डोके, मान, पाय ,पाठ मायांग, कास आदी भागावरील त्वचेबर हळु हळु 1 ते 5 से.मी.व्यासाच्या गाठी येतात. काही वेळा तोंडात, नाकात व डाळ्यात व्रण येतात. तोंडातील व्रणांमुळे जनावरास चारा चघळ्ण्यास व रवंथ करण्यास त्रास होतो. डोळ्यातील व्रणांमुळे चिपडे येऊन पापण्या चिकटुन दृष्टी बाधीत होते. या आजारात जनावराला फुफुसदाह स्तनदाह देखील होतो. फुफुसदाह झाल्यामुळे जनावराला श्वसनास त्रास होतो व धाप लागते. रक्तातील पांढऱया पेशी व प्लेटलेट्स कमी होतात त्यामुळे जनावराला अन्य जीवानूजन्य आजार होण्याची शक्यता वाढते. पायावर सुज आल्याने जनावर लंगडते.
लंपी त्वचा रोग आजाराचा प्रसार हा प्रामुख्याने माश्या, गोचीड ,चिलटे यांच्याम़ार्फत एका जनावराकडुन दुसऱया जनावरास होतो. निरोगी जनावराचा रोगी जनावराच्या रोगी जनाराशी संपर्क झाल्याने देखील रोगाचा प्रसार होतो. रोगी जनावराच्या नाकातील तोंडातील डोळ्यातील स्त्रावामध्ये गर्भपात झालेल्या जनावराच्या गर्भपात स्त्रावामध्ये देखील विषाणु असतात त्यामुळे बाधीत जनावराच्या स्त्रावांसोबत निरोगी जनावराचा संपर्क आल्यास निरोगी जनावरालाही हा रोग होऊ शकतो. या रोगाचा पसरण्याचा दर हा 10 ते 20 टक्के असुन काही वेळा 45 टक्के पर्यंतही असतो. मृत्युदर 1 ते 5 टक्यापर्यंत आहे.
स्वच्छतेवर अधिक भर द्यावा
सध्या जिल्हय़ात ‘लंपी’ आजाराची लक्षणे काही जणावरांमध्ये आढळुन आली आहेत. पशुविभागातील सर्वच कर्मचाऱयांतर्फे या आजाराबाबत जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता, जनावरांच्या गोठय़ाची नियमित स्वच्छता करावी. जनावरांमध्ये या आजाराबाबत कोणतेही लक्षण आढळुन आल्यास त्वरीत जवळील पशुविभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, जनावरांची लसिकरण करून घ्यावे. तसेच परराज्यातुन किंवा जिल्हय़ातुन कोणते ही जाणावर खरेदी करू नये.