जिल्ह्य़ात एकूण १४९ जनावरांना लागण
प्रतिनिधी/सातारा
कोरोना प्रमाणेच पशुधनांमध्ये लम्पी स्किन हा आजार फैलावत असून पशुविभागातर्फे बाधित भागातील जनावरांचे लसीकरणही करण्यात येत आहे. दि. ४ सप्टेंबर रोजी जिल्हय़ात केवळ ५ जनावरांना या आजाराची लागण झाली होती. पण हा संसर्गजन्य आजार असल्याने केवळ १० दिवसातच बाधित जनावरांचा आकडा हा १०० पार गेला आहे. त्यातच जिल्हय़ात एकूण ५ जनावरे लम्पी आजाराने दगावली आहेत, तर एकुण १४९ जनावरांना याची लागण झाली आहे.
या बाधित जनावरांचे आयसोलेशन करण्यात आले असुन, बाधित भागातील 5 किलो मी. पर्यंतच्या उर्वरीत जणावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. जिल्हय़ातील १४९ जणावरांपैकी १२२ गायी व २७ बैलांना या रोगाची लागण झाली आहे. एकुण ५ जाणावरे दगावली असून यामध्ये ४ गायी व एका बैलाचा मृत्यू झाला आहे. यापैकी अधिकतर जणावरे ही फलटण तालुक्यातीलच आहे. दगावलेल्या जाणावरे ही वाघेरी (बैल) तालुका कराड, गायी-जिंती ता. फलटण, शिंदेवाडी आसू ता. फलटण, मानेवाडी ता. खटाव, सोनवडी ता. फलटण येथील आहेत.
हे ही वाचा : सांगली जिल्ह्यात लम्पीचा पहिला बळी