Tarun Bharat

कोल्हापुरातील जनावरांना लम्पीचा धोका, लम्पीग्रस्त भटकी जनावरे रस्त्यावर

भटक्या जनावरांना लम्पी : शहरात अनेक गाईंच्या अंगावर मोठे फोड : प्रसार झपाट्य़ाने होण्याची भीती : तातडीने लसीकरण व मोकाट जनावरांना क्वारंटाईनची गरज

कोल्हापूर/संतोष पाटील

आठ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात लम्पी स्किन आजरामुळे आडे आठ हजारांहून अधिक पशूंचा मृत्यू झाला आहे. कोल्हापुरात आतापर्यंत 70 जनावरांना लम्पी झाला असून त्यातील दोन जनावरे दगावली. कोल्हापूर शहरातील भटक्या गाईंनाही लम्पी झाल्याचे आढळल्याने लम्पीचा प्रसार झपाटय़ाने होण्याची भीती व्यक्त होत आहे. भटक्या जनावरांचा शोध घेवून पुणे जिह्याच्या धरतीवर फिरते पथक नेमून तातडीने लसीकरण करणे, मोकाट जनावरांना स्वतंत्रपणे क्वारंटाईन करण्याची मोहीम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

शहरातील महापालिका, लक्ष्मीपूरी, सीबीएस परिसर, सर्वच भाजी मंडई आदी परिसरात मोठय़ा प्रमाणात मोकाट गाईंचा वावर आहे. यातील अनेक गाईंच्या अंगावर मोठे फोड उठले आहेत. अतिशय अशक्त झालेली जनावरे संथ गतीने वावर करत असून त्यांच्या तोंडातून मोठय़ा प्रमाणात लाळ गळत आहे. ही जनावरे सतत ठिकाणे बदलत असतात. शहरात मच्छर आणि माशांसह गोचीडांचे प्रमाणही अधिक आहे. ही जनावरे गोठय़ातील सुरक्षित पशूधनासाठी घातक ठरत आहेत. कोल्हापुरातही सुमारे पाचशेहून अधिक मोकाट जनावरे रस्त्यावर असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषद, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने स्वतंत्रपणे मोहीम उघडून मोकाट जनावरे स्वतंत्र ठेवण्यासह औषधाची व्यवस्था करण्या

हे ही वाचा : गाईने फरफटत नेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

15 सप्टेंबपर्यंत संपूर्ण देशात 80 हजारांहून जनावरांचा मृत्यू झाला आहे. राज्यनिहाय विचार करता राज्यस्थानमध्ये सर्वाधिक 45063, पंजाबमध्ये 16866, गुजरातमध्ये 5344 आणि हरियाणात 1810 जनावरांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापुरात 8 लाख 54 हजार पशूधन आहे. त्यामध्ये दोन लाख 83 हजार गाई आहेत. एक लाखाहून अधिक जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आतापर्यंत 73 जनावरांना लम्पी झाला असून शनिवारी संध्याकाळपर्यंत दोन जनावरे दगावली आहेत. विशेष म्हणजे लम्पी आजाराग्रस्त जनावराचे दूध पिल्याने किंवा संपर्कात आल्याने मानवी जीवास कोणताही धोका होत नसल्याचे तज्ञांनी सांगितले आहे.

ही आहेत लक्षणं
आजाराचा संसर्ग झाल्यास प्रथम जनावरांच्या डोळयातून व नाकातून पाणी येते. लसिका ग्रंथींना सूज येते. सुरुवातीस ताप येतो. दुधाचे प्रमाण वेगाने कमी होते. दूध देणेच बंद करतात. चारा खाणे, पाणी पिणे कमी होते. हळूहळू डोके, मान, मायांग, कास आदी भागाच्या त्वचेवर 10-50 मिमी व्यासाच्या गाठी येतात. जनावरे लाळ गाळतात. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. डोळयातील व्रणामुळे चिपडे येतात. दृष्टी बाधित होते. पायावर सूज येऊन काही जनावरे लंगडतात.

ही घ्या काळजी
शहर परिसरात अशी मोकाट जनावरे पकडून संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने त्यांची स्वतंत्रपणे व्यवस्था करण्याची गरज आहे. लम्पी त्वचा रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये या करिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये, याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे. बाह्य कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठयांची व्यवस्थित स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. – ए. वाय. पठाण ( जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त)

लम्पीच्या धास्तीने प्रशासनाने कोल्हापुरातील प्रसिध्द दूधकट्टा बंद केला. ज्या परिसरात सर्वाधिक गाई-म्हैशी आहेत याच गवळगल्ली परिसरात मोकाट जनावरांचा वावर अधिक आहे. लाळ गाळणाऱया आणि अंगभर फोड उठलेल्या गाई संपूर्ण शहरात फिरत असून महापालिकेने यावर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे. – निशिकांत मेथे (माजी नगरसेवक)

Related Stories

नागासोबतचा जीवघेणा स्टंट पडला महागात

Archana Banage

हर्षनील प्रतिष्ठानची आर्थिक दुर्बलांसाठी धडपड

Kalyani Amanagi

चित्रपट महामंडळाचा निवडणूक कार्यक्रम तयार

Archana Banage

कोल्हापूर : दिवसरात्र होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे नागरिकांचा जीव टांगणीला..

Archana Banage

Satara : सह्याद्री देवराईमध्ये 8 तारखेला बटरफ्लाय गार्डनचे उद्घाटन- अभिनेते सयाजी शिंदे

Abhijeet Khandekar

शिंदेवाडीतील पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage