उपचार करण्यासाठी रॅपिड ऍक्शन पथक सज्ज, दवाखान्याशी संपर्क साधण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
तालुक्मयाच्या पूर्व भागातील काही गावांमध्ये जनावरांना लम्पिस्किनची (त्वचारोग) लागण होत असल्याने पशुपालक शेतकऱयांची चिंता वाढली आहे. या रोगामुळे जनावरांच्या अंगावर गाठी येणे, फोड येणे व त्यानंतर जखम होणे अशी लक्षणे दिसून येत आहेत. हा नवीन रोग असला तरी शेतकऱयांनी घाबरून न जाता, जनावरांमध्ये अशी लक्षणे दिसून येताच तातडीने जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सांबरा भागातील निलजी, कुडची शिंदोळी, मुतगा, बसरीकट्टी, चंदगड, खनगाव आदी गावातून लम्पिस्किन रोगाची लागण झालेली जनावरे आढळून आली आहेत. त्यामुळे पशुपालक शेतकऱयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सद्यस्थितीत यावर प्रतिबंधात्मक लस किंवा औषधोपचार उपलब्ध नाहीत. मात्र आजारी जनावराच्या लक्षणानुसार उपचार केल्यास जनावर पूर्णपणे बरे होते. यासाठी पशुसंगोपनने पूर्व भागात ‘रॅपिड ऍक्शन’ पथक सज्ज ठेवले आहे. या माध्यमातून लागण झालेल्या जनावरांना घरोघरी जावून उपचार दिले जात आहेत. त्यामुळे शेतकऱयांनी अशी लक्षणे दिसून येताच रॅपिड ऍक्शन पथकाला किंवा पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.
हा संसर्गजन्य आजार असल्याने झपाटय़ाने फैलावतो. त्यामुळे शेतकऱयांनी लागण झालेले जनावर तातडीने वेगळे करावे, शिवाय बाहेर सोडू नये, असे आवाहन देखील खात्याने केले आहे. बाधित जनावरांपासून डास, माशा चावल्यानंतर इतर जनावरांना या रोगाची लागण होते. जनावरांच्या अंगावर अचानक गाठी येतात. त्यामुळे जनावर अशक्त होवून आजारी पडते. शिवाय दूध क्षमताही कमी होते. त्यामुळे पशुपालकांना मोठा फटका बसू शकतो. यासाठी पशुपालकांनी जनावरांची काळजी घेतली पाहिजे. शिवाय अशी लक्षणे दिसून येताच तातडीने जनावरांवर उपचार करून घ्यावेत.
हा आजार इतर जनावरांना होवू नये, यासाठी बाधित जनावर स्वतंत्र्य ठिकाणी बांधावे, हा आजार गाय, म्हैस आणि बैलांना देखील होवू शकतो. त्यामुळे जनावरे शर्यती आणि बाजारात विकण्यासाठी नेवू नये, शिवाय जनावरे धुण्यासाठी आणि चरण्यासाठी बाहेर सोडू नये, असे आवाहन खात्याने केले आहे. मागील चार दिवसांपासून या आजाराची लक्षणे समोर येत असून सर्वत्र फैलाव होत आहे. त्यामुळे शेतकऱयांनी गोठय़ात औषधांची फवारणी करून नियंत्रण आणावे, असे सांगितले.
नियंत्रण
- बाधित जनावर वेगळे ठेवणे
- बाधित आणि निरोगी जनावरे एकत्रित चरावयास सोडू नयेत
- बाधित भागातून जनावरांची ने-आण बंद करावी
- जनावरांच्या संपर्कात आलेले साहित्य, परिसर निर्जंतूक करावे
- माशा, डास, चिलटे व गोचीड आदींचे निर्मूलन करावे
- गोठा दररोज स्वच्छ करावा
लक्षणे
- प्रथम जनावरांचे डोळे, नाकातून पाणी येते
- लसिका ग्रंथीना सूज येते.
- एक आठवडाभर भरपूर ताप येतो. दुग्ध क्षमता कमी होते.
- त्वचेवर हळुहळू 10 ते 50 मीमी व्यासाच्या गाठी येतात
- प्रामुख्याने डोळे, मान, पाय मायांग कास आदी भागात गाठी येतात
- काही वेळा तोंड, नाक व डोळय़ात जखमा होतात.
- सांधे व पायामध्ये सुज येऊन जनावरे लंगडतात.
लक्षणे दिसताच तातडीने उपचार करून घ्या
तालुक्याच्या पूर्व भागात लम्पिस्किनची लक्षणे दिसून आली आहेत. मात्र तातडीने उपचार करण्यासाठी रॅपिड ऍक्शन पथक सज्ज ठेवले आहे. लक्षणे दिसताच शेतकऱयांनी तातडीने उपचार करून घ्यावेत, बाधित जनावराला गोठय़ात जावून उपचार दिले जात आहे.
– डॉ. आनंद पाटील (साहाय्यक संचालक पशुसंगोपन खाते)