Tarun Bharat

लक्झरी कार उत्पादन 2022 मध्ये विक्रमी टप्पा गाठणार

Advertisements

लक्झरी कार निर्मिती करणाऱया कंपन्यांचा राहणार समावेश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मागणीचा विचार करता लक्झरी कार बनवणाऱया प्रमुख कंपन्या चालू वर्षामध्ये लक्झरी कार निर्मितीत 2022 मध्ये विक्रमी टप्पा प्राप्त करणार असल्याचे संकेत आहेत. 

आता सणासुदीचा हंगाम सुरू झाल्यामुळे आणि जोरदार वाढत्या वाहन  मागणीमुळे प्रमुख लक्झरी कार निर्मात्यांना 2022 मध्ये विक्रमी विक्रीची अपेक्षा आहे. चिप्सचा सतत तुटवडा असूनही, कंपन्यांना सध्याच्या सणासुदीच्या काळात विक्री वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

2019 मध्ये देशात लक्झरी कारची विक्री सुमारे 40,000 युनिट्स होती, जी या क्षेत्रातील उद्योगाने एका वर्षात नोंदवलेली सर्वोत्तम विक्री असल्याची माहिती आहे.

उद्योग मजबूत होत आहे ः  सोनी

लेक्सस इंडियाचे अध्यक्ष नवीन सोनी यांनी पीटीआयला सांगितले की, ‘उद्योग मजबूत झाला आहे आणि कोविड-19 महामारीची तिसरी लाट इतकी गंभीर नसल्यामुळे आता उद्योग बऱयापैकी स्थिरावत आहेत’

सोनी म्हणाले की, चालू वर्षाची सुरुवात उद्योग आणि लेक्सस इंडिया या दोघांसाठी चांगली झाली आहे. मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेंक म्हणाले की, येत्या सणासुदीच्या कालावधीत दुसऱया तिमाहीत विक्रीचा वेग कायम राहील अशी कंपनीची अपेक्षा आहे.

यामध्ये पुरवठय़ाच्या बाजूने आव्हाने कायम आहेत. सणासुदीच्या काळात सेमीकंडक्टरची कमतरता राहील या भीतीमुळे हे आहे. यामध्ये ऑडी इंडियाने असेही म्हटले आहे की गेल्या काही महिन्यांपासून मागणी सातत्याने वाढली आहे. ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग ढिल्लन म्हटले आहे, की वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आगामी काळात सर्व ते प्रयत्न केले जाणार आहेत.

Related Stories

होंडा सीबी 300 एफ दुचाकी भारतीय बाजारात सादर

Patil_p

नवीन ऍक्टिव्हा स्कूटर बाजारात दाखल

Patil_p

टोयोटा मोटरची ‘द अर्बन क्रूझर..’ दाखल

Patil_p

एप्रिलमध्ये किरकोळ वाहन विक्री 37 टक्क्यांनी वाढली

Amit Kulkarni

टेस्लासमोर कार सादर करण्याच्या अडचणी

Patil_p

होंडाची एक्स-ब्लेड बाजारात

Patil_p
error: Content is protected !!