Tarun Bharat

मुंबईत एम.सी.झेड.एम.ए. कार्यालयात आ. वैभव नाईकांच्या नेतृत्वात शिवसैनिकांच आंदोलन

M.C.Z.MA in Mumbai. Come to the office. Movement of Shiv Sainiks under the leadership of Vaibhav Naik

एम.सी.झेड.एम.ए.च्या आज संपन्न झालेल्या बैठकीच्या अजेंड्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व मालवण तालुक्यातील सागरी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची सीआरझेड परवानगीची प्रकरणे डावलली असल्याने आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मुंबई नरिमन पॉईंट येथील एम.सी.झेड.एम.ए. च्या कार्यालयामध्ये आंदोलन केले.यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची सीआरझेड परवानगीची प्रकरणे पुढील बैठकीत समाविष्ट करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे वायरी, दांडी,सर्जेकोट,मसुरे खोत जुवा तळाशील, देवबाग, मेढा राजकोट, येथील सागरी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची प्रकरणे मंजूर झाली आहेत. मात्र सीआरझेड परवानगी मुळे ही कामे थांबली आहेत. गेले काही महिने पाठपुरावा करून देखील कामांना मान्यता देण्यात आलेली नाही. तसेच आजच्या बैठकीत देखील सदर प्रकरणे अजेंड्यावर घेण्यात आलेली नाहीत त्यामुळे हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पंढरी तावडे, संदेश कानडे,अनंत पाटकर, अमोल पाटकर ,अक्षय देसाई, अजय रोहरा, विकास चिले आदी उपस्थित होते.

मालवण / प्रतिनिधी

Related Stories

सारथी संस्थेस खारघरमधील भूखंड देण्यास मान्यता

Kalyani Amanagi

महाराष्ट्रात 14,492 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

एसटी कामगार, इंटक पदाधिकारी कामगार सेनेत

NIKHIL_N

पीएम मोदींच्या ‘मन की बात’वर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले…

Archana Banage

माने वहिनी, यड्रावकर यांना किंमत मोजायला लावू

Archana Banage

महागाईचा भडका : पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महाग

Tousif Mujawar