Tarun Bharat

एम. आर. भंडारे स्कूलचे क्रीडा स्पर्धेत यश

Advertisements

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये एसकेई सोसायटीची एम. आर. भंडारे प्राथमिक व माध्यमिक गटाने घवघवीत यश संपादन केले.

प्राथमिक गटात मुलांच्या हॉकीमध्ये चंदरगी येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेत  उपविजेतेपद पटकाविले. यामधील 5 विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मुलींच्या गटात टिळकवाडी विभागीय स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळाला आहे. बैलहोंगल येथे घेण्यात आलेल्या योगा जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सुमीत वागुकर व समर्थ वागुकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. त्यांची राज्यपातळीसाठी निवड करण्यात आली आहे.

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत चिन्मय केळकरने प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत अक्षता कटगेन्नावरने प्रथम क्रमांक मिळवला. प्रितम वागुकरने योगामध्ये जिल्हास्तरीय  स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत अक्षता कटगेण्णावरने द्वितीय क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ती पात्र ठरली. या खेळाडूंना मुख्याध्यापक एस. डी. नायक, मुख्याध्यापक सदाशिव वैजनाथमठ यांचे प्रोत्साहन तर क्रीडा शिक्षक प्रवीण पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहेत.

Related Stories

कंझ्युमर आयुक्त फोरमसाठी आंदोलन

Amit Kulkarni

बेला प्रदर्शन मेळाव्याचे उद्घाटन

Patil_p

हेस्कॉम कार्यालयात साडेअकरा लाखाची चोरी

Omkar B

मजगाव शेतवडीतील 7 पंपसेटची चोरी

Amit Kulkarni

ज्ञानेश्वरी माऊली सेवा मंडळातर्फे पारायण सोहळय़ाची सांगता

Patil_p

उपनोंदणी कार्यालयाची इमारत कधी होणार?

Patil_p
error: Content is protected !!