प्रतिनिधी /बेळगाव
एम. व्ही. हेरवाडकर शाळेमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राचार्य सुनील कुसाणे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. याप्रसंगी बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीचे चेअरमन डॉ. अजित कुलकर्णी, उपाध्यक्ष दिलीप चिटणीस, सदस्य पंकज शिवलकर, अलका कुलकर्णी, ज्ञानेश कलघटगी, उपप्राचार्य अरुण पाटील, प्रेमा रायकर, शर्मिला देशपांडे आदी उपस्थित होते.
प्रारंभी स्वागतगीत झाल्यानंतर कुसाणे यांनी अभ्यासामध्ये शिस्तीचे महत्त्व, अभ्यासाची रुपरेषा, अभ्यासाचे नियोजन, वेळापत्रक, इंग्रजी संभाषण याबद्दल माहिती दिली. यावेळी शिक्षक कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन राजेश्री गोजगेकर व सिद्धी कळ्ळीमनी यांनी केले. दिया हणमण्णावर यांनी व्याख्यानाचा हेतू सांगितला. प्रणव आनंदाचे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रसाद हर्डीकर यांनी आभार मानले.