प्रतिनिधी / बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या एम. ए. 2022-23 साठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर होती. त्यामध्ये वाढ करण्यात आली असून अंतिम तारीख 26 नोव्हेंबर करण्यात आलेली आहे.
UUCMS (https://uucms.karnataka.gov.in) मध्ये ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर डाऊनलोड करून अर्जाची प्रत, आधारकार्ड, दहावीचे प्रमाणपत्र, जात आणि उत्पन्न प्रमाणपत्र, पदवीचे प्रमाणपत्र, दोन फोटो यासह विद्यापीठातील मराठी विभागाशी संपर्क साधावा, अथवा पोस्टाने पाठविल्यास युयुसीएमएसद्वारेच आलेले अर्ज स्वीकारले जातील. कोणत्याही पदवीचा विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे (9480539762), प्रा. डॉ. मनीषा नेसरकर (9900484161), डॉ. मैजोदिन मुतवल्ली (9972457859), डॉ. संजय कांबळे (9164358489) यांच्याशी संपर्क साधावा.