सरचिटणीसपदी श्रीकांत कदम : उर्वरित पदांसाठीही 15 फेब्रुवारीपर्यंत मागविले अर्ज
बेळगाव ; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वाची बैठक बुधवारी युवा समिती कार्यालयात झाली. मागील कार्यकारिणीचा कार्यकाळ समाप्त झाल्यामुळे नवीन कार्यकारिणी निवडीचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षपदी अंकुश अरविंद केसरकर व सरचिटणीसपदी श्रीकांत कदम यांची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अंकुश केसरकर यांचा सत्कार नगरसेवक शिवाजी मंडोळकर व युवा नेते शुभम शेळके यांच्या हस्ते तर श्रीकांत कदम यांच्या सत्कार ज्ञानेश्वर मन्नुरकर यांनी केला. उर्वरित पदांसाठी येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
तसेच येत्या 28 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने धरणे आंदोलन छेडले जाणार आहे. ते आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी युवा समिती कार्यालयात नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले. यावेळी इतर विषयांवरसुद्धा चर्चा करण्यात आली. यावेळी अध्यक्ष अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, शुभम शेळके, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, सूरज कुडूचकर, संतोष कृष्णाचे, महेश जाधव, सचिन केळवेकर, बापु भडांगे, वासु सामजी, ज्ञानेश्वर मण्णूरकर, प्रवीण रेडेकर, विनायक कावळे, मनोहर हुंदरे, भावेश बिर्जे, किरण मोदगेकर, साईनाथ शिरोडकर, अजय सुतार, नारायण मुचंडीकर, जोतिबा पाटील, आनंद पाटील, ओमकार आपटेकर आदी उपस्थित होते.