क्रीडा प्रतिनिधी/बेळगाव
कडोली येथे शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय थ्रोबॉल स्पर्धेत सरकारी मराठी मुलांची शाळा मच्छे संघाने अंतिम सामन्यात साई स्कुल हुदली संघाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. हा संघ जिल्हास्तरीय थ्रोबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या संघाला क्रीडा शिक्षक एस. डी. देवडी यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापक एन. व्ही. देसाई यांचे प्रोत्साहन लाभत आहे.