Tarun Bharat

‘मेड इन इंडिया’चा आयफोन अमेरिका-इंग्लंडच्या ग्राहकांकडे?

चीनला बसणार जोरदार फटका ः निर्मिती भारतात करण्याकडे कल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अमेरिकेतील दिग्गज स्मार्टफोन कंपनी ऍपल आता आपला आयफोन निर्मिती विभाग चीनच्या बाहेर आणण्याच्या तयारीत आहे. चीनमध्ये लॉकडाऊन आणि त्याला होणाऱया विरोधामुळे आयफोनच्या उत्पादनामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. या कारणास्तव उत्पादनात व्यत्यय येत असल्याने आता ऍपल नवा विचार करत असल्याची बातमी आहे.

लॉकडाऊन विरोधामुळे आयफोन निर्मिती फॉक्सकॉनच्या उत्पादन युनिटमधील उत्पादन थांबवावे लागले. उत्पादनामधील अडचणीमुळे आयफोन प्रतीक्षेचा वेळ अधिकच वाढत आहे. आयफोन 14 प्रो ची सरासरी प्रतीक्षा वेळ 37 दिवसांपर्यंत वाढली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, आयफोन निर्मिती झेंगझू यांनी या हंगामात 6 दशलक्ष कमी आयफोन तयार केले आहेत. ऍपल आता उत्पादन प्रक्रियेतील अडथळय़ामुळे चीनबाहेर मोठी बाजारपेठ शोधत आहे. ऍपलने आता आपल्या पुरवठादारांना भारत आणि व्हिएतनाममध्ये हॅण्डसेट असेंबल करण्याच्या योजनांवर काम करण्यास सांगितले आहे.

चीनला झटका देत भारत बनणार आयफोन निर्माता

अलीकडेच, वॉल स्ट्रीट जनरलने एका अहवालामध्ये लिहले आहे, की फॉक्सकॉनच्या चीनमधील झेंगझू कारखान्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर तेथील आयफोन उत्पादन चीनच्या बाहेर नेण्याच्या तयारीत आहेत. सीएनबीसीच्या अहवालानुसार ऍपल भारतात आयपॅडचे उत्पादन सुरु करु शकते. काही दिवसांपूर्वी ऍपलने चेन्नईच्या श्रीपेरंबदूर येथे असलेल्या फॉक्सकॉन युनिटमध्ये आयफोन 14 चे उत्पादन सुरु करण्याची घोषणा केली. कंपनीने केवळ आयफोन 14 च नाही तर भारतात आयफोन असेंबल करण्यासही सुरुवात केली आहे.

Related Stories

स्मार्टफोन कंपनी रियलमीचा टीव्ही येणार

Patil_p

सॅमसंगचा गॅलेक्सी एम-21 मॉडेल सादर

tarunbharat

वनप्लस-9 आवृत्ती 2021 मध्ये येणार

Patil_p

7 जानेवारीला गॅलक्सी एम 02 बाजारात

Patil_p

ब्रिटनने भारतासह अन्य देशांच्या मदतीने आखली 5-जी क्लब योजना

Omkar B

एलजीचा फिरत्या स्क्रीनचा फोन 14 सप्टेंबरला येणार

Patil_p