Tarun Bharat

मडगाव पालिका मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांची बदली

Advertisements

17 महिने दिली सेवा, रोहित कदम नवे मुख्याधिकारी

प्रतिनिधी /मडगाव

मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांची अखेर 17 महिन्यांनंतर गोवा राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. रोहित कदम यांची फर्नांडिस यांच्या जागी मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

फर्नांडिस यांनी 17 महिने पालिकेत सेवा दिली आणि कचऱयावर बायोमिथेनेशनद्वारे प्रक्रिया करण्याचा प्रकल्प मार्गी लावला, जो दक्षिण गोव्यातील अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प ठरला. याखेरीज कर थकबाकी वसुलीसह अनेक उपक्रमांमध्ये त्यांनी मोलाची भर घातली. सहज उपलब्ध असलेले अधिकारी म्हणून फर्नांडिस यांचे कार्यालय विद्यार्थी आणि ज्ये÷ नागरिकांसह सर्वांसाठी सर्व काळ खुले राहिले. तथापि, नंतरच्या काही महिन्यांत फर्नांडिस यांना प्रगतशील कार्यात अडथळा निर्माण झाला आणि त्यामुळे त्यांचे अनेक उपक्रम अंमलात आले नाहीत. कोविड-19, पालिका निवडणुका आणि नंतर विधानसभा निवडणुकांमुळे अनेक कामे मार्गी लागू शकली नाहीत. सुरुवातीला फक्त एक बायोमिथेनेशन प्रकल्प कार्यान्वित झाला आणि त्याची परिणामकारकता पाहिल्यानंतर आणखी दोन असे प्रकल्प उभारण्याचा त्यांचा हेतू होता.

दरम्यान, मडगाव पालिकेत नियुक्त केलेल्या कोणत्याही अधिकाऱयास अनेकांच्या दबावामुळे नेहमीच दबून राहावे लागते. मात्र नुकतेच बदली झालेले मुख्याधिकारी  आग्नेलो फर्नांडिस यांनी सर्व शक्ती वापरून अर्ध्या किमतीचा 5 टन क्षमतेचा बायोमिथेनेशन प्रकल्प एसजीपीडीए मार्केटमध्ये उभारून दाखविला. याबद्दल ते खरोखरच कौतुकास पात्र आहेत, असे बदलीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी म्हटले आहे.

Related Stories

उद्योगांसाठी विविध मंजुरीपत्रे मिळणार एकत्र

Omkar B

आयआयटीग्रस्तांच्या सर्व समस्या सोडविणार

Patil_p

डॉ. गुरुदास नाटेकर यांचा लायन्स क्लबर्फे सत्कार

Amit Kulkarni

विरोधकांचे घोटाळे बाहेर काढणार

Patil_p

डिचोली नगराध्यक्षपदी कुंदन फळारी बिनविरोध

Amit Kulkarni

सरकारकडून कंत्राटदारांची 500 कोटीची बिले थकली

Patil_p
error: Content is protected !!