‘धोखा राउंड डी कॉर्नर’ चित्रपटात करणार काम
अभिनेता आर. माधवनचा चित्रपट ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ सध्या चित्रपटगृहांमध्ये आहे. इस्रो वैज्ञानिक नंबी नारायण यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचदरम्यान आता चाहत्यांसाठी आणखी एक खूषखबर आहे. आर. माधवनचा नवा चित्रपट ‘धोका राउंड डी कॉर्नर’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे.
आर. माधवनच्या या चित्रपटात अभिनेता अपारशक्ती खुराना, दर्शन कुमार देखील दिसून येणार आहेत. चित्रपटाची निर्मिती भूषण कुमारची कंपनी टी-सीरिजकडून करण्यात आली आहे. या चित्रपटाद्वारे निर्माता भूषण कुमारची बहिण खुशाली कुमार स्वतःचे बॉलिवूड पदार्पण करणार आहे.
‘धोका राउंड डी कॉर्नर’ चित्रपट हा रहस्यमय धाटणीचा आहे. एका अब्जाधीश दांपत्याच्या अवतीभोवती घुटमळणारी याची कहाणी आहे. कूकी गुलाटी यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला हा चित्रपट आता 23 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.