सावंतवाडी / प्रतिनिधी-
माडखोल येथील ग्रामस्थ 15 ऑगस्ट ला कोल्हापूरच्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती कार्यालयासमोर माडखोल देवस्थान जमिनीची विक्री झाल्याबद्दल उपोषणास बसणार आहेत. रविवारी रात्री ग्रामस्थ कोल्हापूरला रवाना होणार आहेत राजकुमार राउळ आणि ग्रामस्थ गेले सहा महिने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान उपसमिती उपकार्यालय सावंतवाडी, महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर यांना वारंवार पत्रव्यवहार करून जमीन विक्री बाबत कारवाई करावी अशी मागणी करीत आहेत. अद्याप कारवाई झाली नाही. त्यामुळे समस्त ग्रामस्थ उपोषणास बसणार आहेत देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती माडखोल तत्काळ बरखास्त करावी, पावणाई देवस्थान जमीन विक्री करणार्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, जमीन विक्री करते वेळी असलेले साक्षीदार त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, नवीन स्थानिक देवस्थान सल्लागार समिती स्थापन करणे, जुन्या स्थानिक उपसमितीतील सदस्यांची नवीन सल्लागार समितीवर नेमणूक करू नये अशा मागण्या ग्रामस्थांच्या आहेत.