Tarun Bharat

‘इथे’ जाणवते चमत्कारी शक्ती..!

Advertisements

प्रत्येकाला चमत्कारीक गोष्टी बघायला आवडतात. मग ते जादूचे प्रयोग असोत वा सिनेमा. चुंबकाकडे लोखंडी वस्तू खेचली जाणे आपल्यासाठी नवलाईची बाब नाहि. मात्र, निसर्गात असे दृश्य पाहायला मिळाल्यावर आपले डोळे निश्चितच विस्फारू शकतात.

जगाच्या पाठीवर अशी काही ठिकाणे आहेत जिथे टेकडीच्या रस्त्यावर न्यूट्रल स्थितीत असलेली वाहने आपोआप वरच्या दिशेने खेचली जातात. त्यापैकी दोन ज्ञात ठिकाणे तर ’भारतातच आहेत.

लडाख मधील लेह येथील एका डोंगराला ’मॅग्नेटिक हिल’ असे म्हणतात. त्याचे कारण म्हणजे तिथे गाडी न्यूट्रलवर ठेवली तरी ती खालच्या दिशेने घसरत न येता चक्क वरच्या दिशेनेच जाऊ लागते. हे आजमावण्यासाठी अनेक लोक याठिकाणी असलेल्या रस्त्यावर गाडी बंद करून पाहतात. तशी माहिती देणारा फलक तेथे लावण्यात आले आहे.

गुजरातमधील एक रस्ताहि असाच नैसर्गिक चमत्कार दाखवणारा आहे. हा रस्ता अमरोली आणि सोमनाथ जिल्ह्याच्या सीमेवर आहे. या तुळशीशाम रस्त्यावर मॅग्नेटिक हिलप्रमाणेच गाडी आपोआप वरच्या दिशेने खेचली जाते.

तुळशीशाम

अमेरिकेत फ्लोरिडातील ’स्पूक हिल’ हे ठिकाणहि असेच आहे. तिथेहि वाहन न्यूट्रल स्थितीत ठेवले तरी ते वरच्या दिशेने खेचले जाते.

’स्पूक हिल’

Related Stories

भारतीय लस चीनला झोंबली

Patil_p

पंजशीरवर तालिबानचा ताबा? अमरुल्ला सालेह म्हणाले…

Abhijeet Shinde

किमच्या बहिणीकडून आण्विक हल्ल्याची धमकी

Patil_p

आंदोलकांना दिसताक्षणी गोळ्या घाला; कझाकिस्तान सरकारचे आदेश

datta jadhav

दोन कुटुंबांना दुप्पट आनंद

Patil_p

इस्रायल, युएई अन् बहारीन यांच्यात करार

Patil_p
error: Content is protected !!