Tarun Bharat

लाबुशेन, हेड यांची शानदार शतके, ऑस्ट्रेलिया दिवसअखेर 3 बाद 330

वृत्तसंस्था /ऍडलेड

गुरुवारपासून येथे सुरू झालेल्या दिवस-रात्रीच्या दुसऱया क्रिकेट कसोटीत खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर यजमान ऑस्ट्रेलियाने विंडीजविरुद्ध पहिल्या डावात 3 बाद 330 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज लाबुशेन तसेच टॅव्हिस हेड यांनी शानदार नाबाद शतके झळकविली. लाबुशेन 120 तर हेड 114 धावांवर खेळत असून या जोडीने चौथ्या गडय़ासाठी 199 धावांची अभेद्य भागीदारी केली आहे.

दोन सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात विंडीजचा दणदणीत पराभव करून आघाडी घेतली असून आता ते या मालिकेत विंडीजचा व्हाईटवॉश करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

या दुसऱया सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात कमिन्सच्या गैरहजेरीत स्टीव्ह स्मिथ कप्तानपदाची धुरा सांभाळत आहे. सलामीची जोडी वॉर्नर आणि ख्वाजा यांनी पहिल्या 9 षटकात सावध फलंदाजी करताना 34 धावा जमविल्या. विंडीजच्या जोसेफने वॉर्नरला डिसिल्वाकरवी झेलबाद केले. वॉर्नरने 29 चेंडूत 4 चौकारांसह 21 धावा जमविल्या. उस्मान ख्वाजा आणि लाबुशेन यांनी दुसऱया गडय़ासाठी 95 धावांची भर घातली. उपाहारापर्यंत विंडीजच्या गोलंदाजांना अधिक यश मिळू शकले नाही. पण उपाहारानंतर विंडीजच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचे 2 फलंदाज झटपट बाद केले. थॉमसने ख्वाजाला पायचीत केले. ख्वाजाने 129 चेंडूत 9 चौकारांसह 62 धावा जमविल्या. ख्वाजाने 2022 च्या क्रिकेट हंगामात आपला 1 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. 42 व्या षटकात ख्वाजा बाद झाला. त्यानंतर पुढील षटकात विंडीजच्या जेसन होल्डरने स्वतःच्याच गोलंदाजीवर कर्णधार स्मिथचा अप्रतिम झेल टिपला. स्मिथला खातेही उघडता आले नाही. ऑस्ट्रेलियाची स्थिती यावेळी 3 बाद 131 अशी होती.

लाबुशेन आणि हेड या जोडीने विंडीजच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेत चौथ्या गडय़ासाठी अभेद्य 199 धावांची भागीदारी केली. विंडीजच्या गोलंदाजांना पहिल्या दिवसातील खेळाच्या शेवटच्या तीन तासांच्या कालावधीत यश मिळू शकले नाही. लाबुशेन 11 चौकारांसह 120 तर हेड 12 चौकारांसह 114 धावांवर खेळत आहे. लाबुशेनने पर्थच्या पहिल्या कसोटीत पहिल्या डावात 204 तर दुसऱया डावात नाबाद 104 धावा झळकविल्या होत्या. या कसोटी मालिकेतील त्याचे हे सलग तिसरे शतक आहे. ऑस्ट्रेलियाच्या टॅव्हिस हेडने आपल्या घरच्या मैदानावर पहिले शतक नोंदविले आहे. या दुसऱया कसोटीत स्नायू दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज हॅझलवूड सहभागी होऊ शकला नाही. टॅव्हिस हेडने पर्थच्या पहिल्या कसोटीत 99 धावा जमविल्या होत्या. त्याचे शतक केवळ एका धावेने हुकले होते. दरम्यान, या दुसऱया कसोटीत लाबुशेनने निर्दोष खेळी केल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ या सामन्यात पुन्हा मोठी धावसंख्या रचण्याची शक्मयता आहे. विंडीजतर्फे जोसेफ, होल्डर आणि थॉमस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया प. डाव 89 षटकात 3 बाद 330 (लाबुशेन खेळत आहे 120, हेड खेळत आहे 114, वॉर्नर 21, उस्मान ख्वाजा 62, स्मिथ 0, जोसेफ 1-81, होल्डर 1-42, थॉमस 1-43).

Related Stories

फुटबॉल संघांच्या शिबिरासाठी गोव्याची निवड

Patil_p

मल्ल सुमित मलिक दुसऱया चाचणीसाठी राजी

Patil_p

केएल राहुलला रोखण्याची पंजाब किंग्सची महत्त्वाकांक्षा

Amit Kulkarni

‘पृथ्वी’ने गाठले विजयाचे ‘शिखर’

Amit Kulkarni

विंडीज-लंका कसोटी मालिका अनिर्णीत

Patil_p

लक्ष्य सेन, मालविका बनसोड दुसऱया फेरीत,

Patil_p