वार्ताहर / माशेल
देऊळवाडा परिवार माशेलतर्फे देवकीकृष्ण परिसर वाडय़ावरील युवकांनी पारंपारिक भव्य नरकासुर प्रतिमा साकरण्याच्या कामाला लागले आहे. रविवार दुपारपर्यंत नरकासुर प्रतिमा देवकीकृष्ण मंदिरासमोरील मैदानावर आणण्यात येईल.
देऊळवाडय़ावर देवकीकृष्ण मंदिराची नरकासुराची वेगळी परंपरा आहे. पुर्वी बैलगाडय़ावर तयार करण्यात येत असलेला नरकासुर वाडय़ावाडय़ावर फेरी मारून आणायाचा. कालांतराने बैलगाडय़ा संपुष्ठात आल्याने देवकीकृष्ण मैदानावर सात फेऱया मारून पहाटे दहन केले जाते. यावेळी शेकडो ग्रामस्थ नरकासुराचे फेरी बघायला मुद्दामहून हजेरी लावत असतात.