महाराष्ट्रद्रोही घटकांच्याविरोधात महाविकास आघाडी 17 तारखेला महामोर्चा काढणार असून याद्वारे महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात हल्लाबोल केला जाणार आहे. यासंबंधीची माहीती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या परिषदेला शिवसेना (ठाकरे गट ) अध्यक्ष उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अजित पवार आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संबोधित केले.
यावेळई बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ” महाविकास आघाडीने 17 तारखेला महाराष्ट्र विद्रोह्य़ांच्या विरोधात हल्लाबोल मोर्चा आयोजित केला आहे. महाराष्ट्राचा सतत अपमान केला जात असून त्यांच्या विरोधात हा मोर्चा आहे. महाराष्ट्रातून उद्योग पळवले जात आहेत त्याच पध्दतीने मुंबईवरसुध्दा घाला घातला जात आहे.”
पुढे बोलताना उद्धव ठकरे म्हणाले कि, भाजपच्या गुजरात यशामागे महाराष्ट्रातील पळवलेल्या उद्योगांचे गुपीत आहे. जसे गुजरातला उद्योग पळवले गेले तसेच कर्नाटक निवडणुकिसाठी गावे पळवली जात आहेत. अशा पध्दतीने सतत महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांविऱोधात महाराष्ट्र प्रेम हा समान धागा पकडून हा मोर्चा य़शस्वी करायचा आहे. महाराष्ट्राला मुख्यमंत्रीच नाहीत. केंद्राच्या दबावामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गप्प आहेत. कर्नाटकने केलेल्या कुरघोडी विऱोधात महाविकास आघाडीच्या खासदारांनी जाब विचारला पण महाराष्ट्रातील इतर खासदार गप्प का होते?” सवाल त्यांनी केला.
यावेळी बोलताना कॉंग्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “महाराष्ट्रातील देवतांचा अपमान ठरवून केला जातो. महाराष्ट्रांच्या उद्योगाबरोबर मुंबईसुद्धा पळवली जाण्याची भिती आहे. मराठी भाषिकांवर अत्याचारावर राज्यातील सरकार मूग गिळून बसले आहे. राज्यात मुंबई धारावीसारखा वादग्रस्त प्रकल्प आणून मुंबईच गुजरातला पळवण्याचा घाट घातला गेला आहे.” असा आरोप त्यांनी केला.
शेवटी बोलताना ऱाष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना कर्नाटकच्या मंत्र्याकडून प्रक्षोभक भाषणे दिली जात आहेत. दोन्ही राज्यमध्ये भाजपची असल्याने तसेच केंद्रातही त्यांचीच सत्ता असताना काय अवघड आहे.? आज महाराष्ट्रात सगळीकडे फुटिरतेची भावना वाढीस लागण्याची कारण सद्याचे सरकार आहे. आजपर्यंत असे कधीच घडले नाही. त्यामुळे महाराष्ट्रद्रोही घटकांविरूद्ध 17 तारखेला हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे.”

