Tarun Bharat

व्यकंटपुऱ्याचा पाणी प्रश्न मिटलाः महादरे तळे ओसांडून वाहू लागले

Advertisements

सातारा: शहराच्या पश्चिम भागातील व्यकंटपूरा, मंगळवार पेठेसह, चिमणपूरा पेठ व कारंडबी नाका परिसराला पाणी पुरवठा करणारे महादरे तळं ओसांडून वाहू लागले आहे. पाण्याची टंचाई दुर झाली आहे, अशी माहिती माजी नगरसेवक अण्णा लेवे यांनी दिली. दरम्यान, व्यंकटपूरा पेठेवर पाण्यासाठी अन्याय झाल्यास खपवून घेणार नाही, आंदोलन छेडू असा इशारा माजी नगरसेवक अविनाश कदम यांनी दिला होता.

महादरे तळ्याद्वारे सातारा शहराच्या पश्चिम भागातील व्यंकटपूरा, चिमणपूरा व काही भागाला पाणी पुरवठा करण्यात येतो. या महादरे तळ्यामधून पूर्वी कासचे पाणी संपूर्ण शहराला पुरवण्यात येत होते. हत्ती तळ्यातून महादरे तळ्यात पाणी जाते. तेव्हा महादरे तळे पुरेपुर भरले जाते. सध्याच्या पावसामुळे महादरे तळे पूरेपुर भरले असून जेवढे पाणी तळ्यात येते तेवढेच बाहेर पडत असून पूर्ण क्षमतेने तळे भरले आहे.

हेही वाचा- Satara Crime: दहशत माजवणारे बकासूर गँगचे 6 जण जेरबंद


पेठेवर अन्याय झाला तर सहन करणार नाही
व्यंकटपूरा पेठेला पाणी पुरवठा करणारे महादरे तळे आहे. तेथील पाणी बंद करण्यात आले होते. कास तलाव तिप्पट क्षमतेने भरलेला असताना नगरपालिकेला पाणी वाढवून देता आले नाही, ही शोकांतिका आहे. महादरे तलाव आता भरला असून त्यात मोटर नाहीत. मोटर सोडण्याचे काम काल सुरु होते. शेवटच्या क्षणापर्यत नागरिकांचा अंत बघणार आहे काय?, आज सीओंना पत्र दिलेला आहे. दोन दिवसात पाणी पुरवठा व्यवस्थित झाला नाही तर पालिकेच्या समोर मोठं आंदोलन छेडण्यात येईल. हे सगळे करत असताना खाजगी गाड्या ठेक्यावर होत्या. त्या येत नाहीत. वाहतूक विभागातून सांगण्यात येते की एक गाडी बंद आहे तर दुसऱ्या फायर फायटर गाडीने पाणी वाटायचे सुरु आहे. काही मंडळींनी खाजगी गाड्या आणल्यात माहिती नाही. नागरिकांनीच बघून घ्यावे. पण व्यंकटपुरा पेठेतल्या नागरिकांवर अन्याय झाला तर कदापी सहन केला जाणार नाही, असा इशारा माजी नगरसेवक अविनाश कदम यांनी दिला आहे.

Related Stories

नागठाणेत शौचालयातील मैला थेट ओढ्यात, कारवाईची मागणी

Abhijeet Shinde

सिव्हील हॉस्पिटलमधील धोब्याच्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यू

Patil_p

महिंद धरणाच्या सांडव्याजवळील संरक्षक भिंत कोसळली

Patil_p

सांगली : पशुवैद्यकीय पदविका धारण करणाऱ्यांना सहकार्यासाठी सेवेत घ्या

Abhijeet Shinde

सातारा जिल्ह्यात 511 नागरिकांना दिला डिस्चार्ज

Abhijeet Shinde

जम्बो हॉस्पिटलची युद्धपातळीवर तयारी….

Patil_p
error: Content is protected !!