पुलाची शिरोली / वार्ताहर
मौजे वडगावातील जनतेची नाळ कायमपणे महाडिक कुटुंबाशी जोडली आहे व इथून पुढेही ती अशीच अतुट राहिल. असे मत भारतीय जनता पार्टीचे नेते खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले. ते मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गंत आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी भाजपा तालुकाध्यक्ष राजेश पाटील होते, प्रमुख उपस्थितीत दलितमित्र अशोकराव माने होते.
खासदार महाडिक पुढे म्हणाले, भारत देशावर कोरोना सारखे फार मोठे संकट आले असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुप धाडशी निर्णय घेतला. आणि आपल्याच देशात कोरोनाची लस विकसित होण्यासाठी प्रोत्साहन दिले . देशातील सामान्यातील सामान्य माणूस जगला पाहिजे या हेतूने इतर कोणत्याही देशात सुविधा नाही. परंतू आपल्या भारत देशात मोफत अन्न धान्य योजना सुरु केली. तसेच या सेवा पंधरवड्यात केंद्र सरकारच्या विविध योजना सामान्य जनते पर्यंत पोहचविल्या जात आहेत. यामध्ये दिव्यांगांना कृत्रिम हातपाय , आरोग्य सेवा योजना, रक्तदान शिबिर , वृक्षारोपण, तसेच सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून जनधन यासारख्या अनेक योजना तळागाळापर्यंत पोहचविल्या जात आहेत. अशा विविध योजनांनी नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा खराअर्थाने सेवा पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे.
यावेळी राजेश पाटील व अविनाश पाटील यांनी मनोगते व्यक्त केली . तसेच दत्त सेवा सोसायटी, गणेश पाणी पुरवठा, जय हनुमान दुध संस्था, किसान सेवा सस्था, ग्रामपंचायत इत्यादी संस्थेतील पदाधिकाऱ्यांच्या वतीने खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेच पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी रावसो चौगुले, श्रीकांत सावंत, मनोहर चौगुले, सरपंच काशीनाथ काबळे, सरिता यादव, सतिश चौगुले, धोंडिराम चौगुले, सुनिल खारेपाटणे, अँड. विजय चौगुले, सतिश वाकरेकर, भुपाल कांबळे, आदम हजारी, अमोल झांबरे, आजमुद्दीन हजारी, शब्बीर हजारी, याच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक प्रदिप लोहार यांनी केले. तर आभार स्वप्नील चौगुले यांनी मानले.