Tarun Bharat

बिहारमध्ये महागठबंधन सरकार; नितीश कुमार मुख्यमंत्री, तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

भाजपला बिहारमध्ये मित्र पक्ष असलेल्या जनता दल युनायटेड (JDU)नेच धक्का दिला आहे. जेडीयूने भाजपची साथ सोडून लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल (RJD) पक्षासोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे मंगळवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द करताच जेडीयू-भाजपचे सरकार कोसळले. यांनतर जेडीयू आणि आरजेडी यांनी सरकार स्थापन केलं आहे. आज नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राजद नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

दरम्यान, बिहारमध्ये आज नवीन शपथविधी सोहळा संपन्न झाला. नितीश कुमार यांनी आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना गोपनीयतेची शपथ दिली. आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

हे ही वाचा: बिहारमध्ये सत्तापालट, संजद-राजद एकत्र

भाजप बरोबरची युती तोडली
नितीश कुमार यांनी काल (सोमवारी) भाजपसोबतची युती तोडून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. नितीश कुमार यांनी भाजपवर जेडीयूचा अपमान करत स्वत:च्या विरोधात कट रचल्याचा आरोप केला होता. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांची भेट घेतली होती. यानंतर महागठबंधनची बैठक झाली. ज्यामध्ये नितीश कुमार यांची नेतेपदी निवड करण्यात आली. महागठबंधनच्या बैठकीत काँग्रेस (Congress)  आणि डाव्या पक्षांचे नेतेही उपस्थित होते.

महागठबंधनचं सरकार 
बैठकीनंतर नितीश कुमार आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव राजभवनात पोहोचले आणि त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. त्यांनी राज्यपाल फागू चौहान यांना 164 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सुपूर्द केलं. नव्या सरकारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री आणि तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Related Stories

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सेट परीक्षा 27 डिसेंबरला

Rohan_P

मिजोरममध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Rohan_P

अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच 10 जण कोरोना पॉझिटिव्ह

datta jadhav

आप आमदार अमानतुल्लाह खान यांना अटक

Patil_p

ऑस्ट्रेलियात भीषण पूर, लाखो लोकांचे स्थलांतर

Patil_p

29 दिवस आयसोलेशन‌मध्ये राहिला, तरीही झाली कोरोनाची लागण

prashant_c
error: Content is protected !!