Tarun Bharat

महालक्ष्मी ओटी भरणे कार्यक्रम मजगावात उत्साहात

Advertisements

बेळगाव : हनुमान जयंतीनिमित्त मजगाव येथे गेले तीन दिवस गाडे यात्रोत्सव उत्साहात सुरू आहे. मंगळवार दि. 19 रोजी श्री महालक्ष्मी देवीची ओटी भरणे कार्यक्रम संपूर्ण दिवसभर उत्साहात संपन्न झाला.

ढोल-ताशे, करडी मदल आदी पारंपरिक वाद्यांच्या गजरात संपूर्ण गावभर भंडाऱयाची उधळण करीत देवीचा जयजयकार करीत मोठय़ा उत्साहान ओटी भरणे कार्यक्रम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता.

यात्रोत्सवानिमित्त सोमवारी रात्री क्राईम ब्रँचच्या डीसीपी डी. व्ही. स्नेहा यांनी येथील जागृत देवस्थान श्री ब्रह्मदेव मंदिराला भेट दिली.

यावेळी उद्यमबाग पोलीस स्थानकाचे सीपीआय धीरज शिंदे व सहकारी उपस्थित होते. यावेळी देवस्थान पंच कमिटीच्यावतीने डी. व्ही. स्नेहा डीसीपी क्राईम ब्रँच यांचे स्वागत प्रमुख पंच शिवाजी पट्टण यांनी केले. यावेळी बी. डी. कुडची, दीपक सातगौडा, भारत धुळाई, विनोद पाटील, कुबेर सोरटूर व मंदिराचे पुजारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी डीसीपी स्नेहा बोलताना, यात्रोत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा होत असल्याने समाधान व्यक्त केले. यावेळी गावच्यावतीने दीपक सातगौडा यांनी आभार मानले.

Related Stories

तुमच्या गावातून कोणी बेपत्ता आहे का हो ?

Omkar B

बकरी बाजार तातडीने सुरू करा

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यात सोमवारी आणखी 14 कोरोनाबाधित रुग्णांची भर

Tousif Mujawar

येळ्ळूरच्या यात्रोत्सवाला प्रारंभ

Amit Kulkarni

पावसामुळे वीजपुरवठा विस्कळीत

Amit Kulkarni

हुबळी-धारवाड पूर्व मतदार संघाचे आमदार पॉझिटिव्ह

Archana Banage
error: Content is protected !!