Tarun Bharat

बिजगर्णी येथे महालक्ष्मी मंदिराचा चौकट पूजन कार्यक्रम उत्साहात

Advertisements

वार्ताहर / किणये

बिजगर्णी येथील महालक्ष्मी मंदिराचा चौकट पूजन सोहळा बुधवारी मोठय़ा उत्साहात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यल्लाप्पा बेळगावकर हे होते. तर स्वागताध्यक्ष म्हणून कल्लाप्पा भाष्कळ हे होते.

गावातील महालक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत असल्यामुळे गावात सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंदिरासाठी लागणारी मुख्य चौकट व गाभारा चौकटींची मिरवणूक दोन दिवसांपूर्वी  गावात व कावळेवाडीमध्ये मोठय़ा उत्साहात झाली. या मिरवणुकीमध्ये महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.

बुधवारी मंदिराच्या चौकट पूजनाचा कार्यक्रम झाला. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी व मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते चौकटीचे पूजन करण्यात आले. तसेच प्रसाद मोरे यांच्या हस्ते गाभारा चौकटीचे पूजन करण्यात आले.

प्रास्ताविक पुंडलिक जाधव यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध देव-देवतांचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा फेटा बांधून विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर, नागेश झंगरुचे, भुजंग सांगावकर, महेश डुकरे, नंदकुमार भैराप्पन्नवर, निंगाप्पा जाधव, शिवाजी पाटील, अशोक गावडा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाला वसंत अष्टेकर, बाळकू मोरे, नामदेव मोरे, रघुनाथ मोरे, शिवाजी जाधव, कल्लाप्पा यळ्ळूरकर, यशवंत जाधव, मारुती जाधव, जोतिबा मोरे, बंडू भास्कर, अब्दुल नावगेकर, कल्लापा अष्टेकर, बबन जाधव, रमेश भास्कर आदी उपस्थित होते. याप्रसंगी काही प्रमुख पाहुण्यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देणग्याही दिल्या.

Related Stories

निपाणीत कोव्हीड केअर सेंटरची तयारी

Patil_p

अनगोळ येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Amit Kulkarni

मंत्री ज्योतीरादित्य सिंधिया यांनी घेतली बेळगाव विमानतळाची दखल

Patil_p

मागील सहा महिन्यांत 20 मेट्रिक टन कार्गो वाहतूक

Amit Kulkarni

संविधान म्हणजे भारताचा सर्वोच्च कायदा

Patil_p

हेस्कॉमचा उद्योजकांना वीजबिलाचा शॉक

Patil_p
error: Content is protected !!