प्रतिनिधी / बेळगाव
नाथ पै सर्कल, शहापूर येथील सोमवंशीय क्षत्रीय समाज, अंबाबाई मंदिरामध्ये आदीशक्मती महिला मंडळातर्फे मंगळवारी महापूजा व सुवासीनींना ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात समाजातील सर्व महिला व महिला मंडळांनी भाग घेतला होता.
यावेळी समाजातील ट्रस्टी, अध्यक्ष, पंच मंडळी, तरुण मंडळांच्या सहकाऱयांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडाला. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. सायंकाळी देवीचा पालखी सोहळा पार पडला. कार्यक्रमासाठी आदी शक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा गीता कल्पवृक्ष, उपाध्यक्षा कविता नाईकवाडी, सुवर्णा धोंगडी, कांचन चौधरी, सुमन मीरजकर, लक्ष्मी रंगरेज, सीमा कटारे, ममता चौधरी, सुरेखा धोंगडी, पुनम नाईकवाडी, अनुराधा रतन आदी महिलांनी परिश्रम घेतले.