Tarun Bharat

महाराजा चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा 7 ऑगस्टपासून

Advertisements

वृत्तसंस्था/ बेंगळूर

कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेतर्फे महाराजा चषक केएससीए टी-20 क्रिकेट स्पर्धा 7 ते 26 ऑगस्ट दरम्यान बेंगळूर-म्हैसूरमध्ये खेळवली जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी दिली आहे.

गेली 2 वर्षे ही स्पर्धा कोरोना महामारी समस्येमुळे खेळविण्यात आली नव्हती त्यामुळे कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेला 2 वर्षांचा कालावधी गमवावा लागला होता. राज्यातील विविध शहरांमध्ये नवोदित क्रिकेटपटूंना या स्पर्धेचा चांगला लाभ घेता येईल असेही भारताचे माजी क्रिकेटपटू बिन्नी यांनी म्हंटले आहे.

सदर स्पर्धा म्हैसूरचे राजे श्रीकांतदत्त नरसिंह महाराज वडियार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ खेळविली जात आहे. वडियार हे कर्नाटक क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष होते. यावेळी या स्पर्धेचे स्वरुप बदलण्यात आले आहे. म्हैसूर आणि बेंगळूर येथील सदर स्पर्धा खेळविली जाणार आहे. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लिग स्पर्धेच्या धर्तीवर ही स्पर्धा होणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव संतोष मेनन यांनी दिली आहे.

ही स्पर्धा कर्नाटकातील 6 विभागात विभागली जाणार असून स्पर्धेतील सामने बेंगळूर, म्हैसूर, शिमोगा, हुबळी, मंगळूर आणि रायचूर या ठिकाणी होतील. या स्पर्धेत सहभागी होणाऱया संघांना स्टुअर्ट बिन्नी, नझिरुद्दीन, मन्सूर अलीखान, निखिल हळदीपूर, दीपक चौगुले, पी. व्ही. शशिकांत हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून लाभतील. या स्पर्धेच्या लोगोचे अनावरण रॉजर बिन्नी यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेचे प्रक्षेपण स्टार स्पोर्टस – 2, स्टार स्पोर्टस कन्नड वाहिनीवरुन करण्यात येणार आहे.

Related Stories

डुप्लांटिस, रोजास वर्षांतील सर्वोत्तम ऍथलीट्स

Patil_p

ऑलिम्पिकमध्ये टी-10 क्रिकेट असावे : ख्रिस गेल

Patil_p

ख्रिस्तियानो रोनाल्डोचा युवेंट्सला निरोप

Patil_p

वॉर्नच्या ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ला २९ वर्षे पूर्ण

Nilkanth Sonar

न्यूझीलंडचा पाकवर डावाने विजय

Omkar B

अर्जेंटिना-चिली सामना बरोबरीत

Patil_p
error: Content is protected !!