Tarun Bharat

एकनाथ शिंदेंच्या गोटातील २१ आमदारांचा आमच्याशी संपर्क; संजय राऊतांचा दावा

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेच्या ४२ आमदारांनी बंड केलं आहे. यामुळे राज्यात मोठी उलथापालथ होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यातच आता शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शन करणारे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjy Raut) यांनी नवा दावा केला आहे. एकनाथ शिंदें यांच्या ताब्यात असलेल्या २१ आमदारांचा आमच्याशी संपर्क झालेला आहे, ते आमदार आमच्यासोबत आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. (Maharashtra Political Crisis)

शिंदे गुजरातला दाखल झाल्यापासून आमदारांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल करत आहेत. शिंदेंना मिळणाऱ्या प्रत्येक आमदाराचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वर्ष निवास्थान सोडताना शिवसैनिकांनी ठिकठिकाणी शक्ती प्रदर्शन केलं होत. यांनतर आज शिंदे गटाकडून शक्ती प्रदर्शन केलं आहे. याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर शिंदेंच्या गोटातून पळून आलेले आमदार कैलास पाटील (Kailas Patil) आणि नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी पत्रकार परिषद घेत घडलेल्या प्रसंगाबाबत माहिती दिली. यावेळी बलताना संजय राऊत यांनी शिंदेबरोबर असणाऱ्या आमदारांपैकी २१ आमदार आमच्या संपर्कात असून ते आमच्या सोबत आहेत, असा दावा केला आहे.

यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, भाजपने शिवसेनेच्या आमदारांना फसवून गुजरातला घेऊन गेले आहेत, कोणी सध्या कितीही फोटो, व्हिडिओ पाठवले असले तरी त्यातील २१ आमदारांचा संपर्क झाला आहे. ते आमदार ज्यावेळी मुंबईत येतील तेव्हा ते उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देतील, असं ते म्हणाले.

एकनाथ शिंदेंचे शक्तिप्रदर्शन
यावेळी शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख उपस्थित होते. यावेळी त्यांनी सर्व घटनाक्रम सांगितला. शिवसेनेसोबत एकुण २३ आमदार असल्याचा दावा यावेळी राऊत यांनी केला. फ्लोअर टेस्टवेळी कोण कोणासोबत आहे, हे समोर येईल असंही संजय राऊत म्हणाले.

Advertisements

Related Stories

कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ! मागील 24 तासात महाराष्ट्रात 54,022 नवे रुग्ण; 898 मृत्यू

Rohan_P

मी बोललो तर त्रास झाला, ते बोलले तर चालतं; स्वबळाच्या नाऱ्यावरून पटोलेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Abhijeet Shinde

सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

Abhijeet Shinde

अठरा वर्षांवरील सर्वांना लस विनामूल्य

Patil_p

श्रीलंकेत महागाईचा भडका; अन्नधान्याची टंचाई

Abhijeet Shinde

पुलाची शिरोली कार्यालयाला अखेर मिळाला कायमस्वरूपी सहाय्यक अभियंता

Abhijeet Shinde
error: Content is protected !!