Tarun Bharat

Assembly Speaker Election Live Update : शिंदे गटाचा शिवसेनेला धक्का,राहुल नार्वेकर बहुमतांनी विजयी


विधानसभा अधिवेशनाला अकरा वाजता सुरुवात झाली. यावेळी उपाध्यक्षांनी आमदारांना मतदान करण्यासाठी जागेवरच उभे राहून नाव आणि अनुक्रमांक उच्चारावे असे सांगितले. सुरुवातीला सभागृहात आमदारांनी गोंधळ घातला. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला. दरम्यान मतदानं सुरु होण्यापूर्वी सभागृहाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. यानंतर अध्यक्षपदाच्या मतदानालां सुरुवात झाली. मतदानावेळी शिंदे गटाने शिवसेनेचा व्हिप डावलला आणि भाजपच्या नार्वेकरांनी मतदानं केल. भाजप आणि शिवसेनेच्या एकूण १६४ आमदारांनी मतदान करत बहुमतांनी विजयी केले. तर महाविकास आघाडीच्या राजन साळवी यांचा पराभूत झाला. यावेळी सपाच्या तीन आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली. तर बविआ आणि मनसेने भाजपला मतदानं केलं.

महाराष्ट्रात सत्तांतराच्या घडामोडी घडत आहेत. नविन सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी दोन दिवसाचे अधिवेशन बोलावले आहे. हे विशेष अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिंदे यांना आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. भाजपाकडून राहुल नार्वेकर रिंगणात असून महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र भाजपाकडून विजयाची खात्री दाखवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह गटाचे आमदार विधानभवनात दाखल झाले आहेत. सर्वांनी भगव्या रंगाचे फेटे घातले आहे. आज दिवसभरात नेमके काय होणार याची अपडेट तुम्हाला देणार आहोत. (Maharashtra Assembly Speaker Election Live)

13:00 ते 13:05 PM- सपाचे आमदार अबू आझमी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे


-बाळासाहेबांच्या नावानं नवीन शहर उभारा.

-नावं बदलून काय साध्य केलं.

-औरंगाबादच्या नामांतरावरुन अबू आझमी आक्रमक

12:55 ते 12: 59 PM शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

-व्हिप झुकारून लोकशाहीची पायमल्ली केली.

-देवेंद्र फडणवीस झाले नाहीत याचे दु:ख वाटते.

-नियतीचे वारे कधीही फिरू शकते.
नार्वेकर

12: 45 ते 12:55 PM- बाळासाहेब थोरात यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे


-सभागृहात सगळ्या बाजू अध्यक्षांना आपल्या वाटतील.

-सगळ्यांना आपले वाटतील असे अध्यक्ष लाभले.

-रामशास्त्री झोपले होते आता जागे झाले.

-अनुभवी सदस्यांना अध्यक्षपद देण्याची आतापर्यंतची परंपरा आहे.

-अध्यक्षपदाची निवडणूक सोपी करण्याचा प्रयत्न केला गेला.

-अध्यक्षपदाला मोठा इतिहास.

-तरुण अध्यक्ष म्हणून लौकिक मिळवाल.

12: 29 ते 12: 45 PM- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे


-अजितदादांची विधानसभेत जोरदार टोलेबाजी.

-भाजपचं नक्की समाधान झालायं का?असा सवालही त्यांनी केला.

-दिपक केसरकर, उदय सामंतांचा विशेष उल्लेख.

-भाजपात राष्ट्रवादीकडून गेलेल्यांचा भरणा जादा. पहिल्या रांगेत आमचीचं मंडळी.

-जावई नार्वेकर अध्यक्ष झाले म्हणून निंबाळकर कुटुंबाचं अभिनंदन.

-शिंदेंनी नार्वेकरांना जवळ कराव- अजितदादांचा सल्ला.

– त्यांच्याकडे कोणत्याही पक्षाच्या नेतृत्वाच्या जवळ जाण्याचे कौशल्य आहे.

-सर्व पक्षात त्यांनी उत्तम काम केलं.

-आदित्य यांचे सहकारी अशी सेनेत असताना त्यांची ओळख होती.

-नार्वेकर कुटुंबाला मोठी राजकीय पार्श्वभुमी आहे.

-नार्वेकर अभ्यासू व्यक्तीमत्त्व. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे.

-नार्वेकर पूर्वी शिवसेनेतं होते.

-कामकाज प्रभावी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

-सर्वात तरुण अध्यक्ष तेवढीच मोठी जबाबदारी असते.

-राहुल नार्वेकरांचे अजित पवार यांच्या कडून अभिनंदन.


12: 17 ते 12: 29 PM- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

– नार्वेकरांनी अनेक लोकहिताची कामं केली. त्यांनी कोळी बांधवांच्या हातासाठी मोठं काम केलं.
-विधानसभा अध्यक्षपद भूषवणं कठीण कामं असतं.
-सासरे निंबाळकर विधान परिषदेचे अध्यक्ष तर नवे अध्यक्ष नार्वेकर
-विधिमंडळात जावई- सासऱ्य़ाचे वर्चस्व.
-विधानसभा अध्यक्षांची भूमिका न्यायाधिशांसारखी असते.
-महाराष्ट्र अध्यपद होणं ही भाग्याची गोष्ट आहे.
-राहुल नार्वेकर हे देशातील सर्वात तरुण अध्यक्ष
-महाराष्ट्राने देशात नविन रकाॅर्ड केलंय.
-राहुल नार्वेकरांचे फडणवीसांकडून अभिनंदन.


12: 10 ते 12: 17 PM- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील महत्त्वाचा मुद्दे.


-भाजपनं माझी सन्मान केला.
-अनेक प्रलोभनं दाखवली, पण हे ५० आमदार एकत्र राहिले.
-विधीमंडळातील पहिली लढाई भाजपने जिंकली.
-राज्यात भाजप-शिवसेनेचं सरकार स्थापन झालंयं.
-वकिल म्हणून शिवसेनेच्या अनेक केसेस लढवल्या.
-सभागृहातील सदस्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्याल.
-शेतकरी, सामान्य नागरीक यांचे प्रश्न सुटतील.
-नार्वेकरांच्या अनुभवाचा फायदा सभागृहाला होईल.
-तत्परतेनं तुम्ही तरुणांचे प्रश्न सोडवालं याची खात्री.
-सत्ताधाऱ्यांना झुकते माप देण्याची गरज नाही.
-कायद्यासमोर तुम्ही सर्वांना समान मानावं.


विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर काय म्हणाले भाषणात.



12: 5 PM- राहुल नार्वेकरांनी अध्यक्षपद स्विकारत अध्यक्षीय भाषण केलं.

12:00 PM विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर विजयी.

11: 55 AM राजन साळवी यांनी १०७ मतं मिळाली.

11: 55 AM सपाचे आमदार अबू आझमी, रईस शेख तटस्थ.

11: 45 AM आदित्य ठाकरेंकडून आईच्या नावाचा उल्लेख.

11: 45 AM- राजन साळवींच्या बाजूने मतदानाला सुरुवात.

11: 45 AM- मविआच्या मतदानाला सुरुवात.

बविआची मतं भाजपला.

मनसेच्या राजू पाटलांच मतदान भाजपला.

11: 41 AM- शिंदे गट आणि भाजपची १६४ मतं

11: 30 AM- शिंदे गटाचा शिवसेनेला धक्का, विधानसभा अध्यपदी भाजपचे राहुल नार्वेकर बहुमतांनी विजयी

11: 30 AM- राहुल नार्वेकरांच्या बाजूने आतापर्यंत एकूण 90 मतं.

11: 24 AM- शिंदे गटाचं नार्वेकरांच्या बाजूनं मतदान.

11:19 AM- शिंदे गटाने सेनेचा व्हिप पाळला नाही.

11:19 AM- आमदारांना होय अथवा नाही म्हणण्याचे आदेश.

11:19 AM- अध्यक्ष पदासाठी शीरगणती सुरु.

11:15 AM- शिंदे गट आणि भाजपची मतमोजणी सुरु.

11:10 AM- थोड्याच वेळात अध्यपदासाठी मतदान. आमदारांनी नाव आणि अनुक्रमांक उच्चारावे असे उपाध्यक्षांनी सांगितले. मतदानासाठी सभागृहाचे सर्व दरवाजे १० मिनिटे बंद केले.

11:10 AM- चेतन तुपेंनी राजन साळवींचा प्रस्ताव मांडला.

11:10 AM- चंद्रकांत पाटलांनी राहुल नार्वेकरांचा प्रस्ताव मांडला.महाजनांकडून नार्वेकरांच्या नावाला अनुमोदन.

11:10 AM- नाना पटोलेंमुळे आजचा दिवस पाहायला मिळाला- देवेंद्र फडणवीसांचा टोला. सभागृहात प्रत्यक्ष मतमोजणी सुरु असताना काही सदस्यांनी गोंधळ घातला. काही सदस्य आसन क्रमांक सांगत असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. यावर जयंत पाटील यांनीदेखील उभं राहून प्रक्रिया व्यवस्थित राबवण्यास सांगितलं.

11:10 AM: राज्यपालांनी एक आदर्श घातलायं-जयंत पाटील.

11:00 Am- अधिवेशनाला सुरुवात

10: 50 Am- विधानभवनात काॅंग्रेसच्या बैठकिला सुरुवात झाली आहे. काॅंग्रेसचे वरिष्ट नेते आणि आमदार उपस्थित राहिले आहेत. या बैठकित राजन साळवी यांनी मतदान करण्य़ाचे आदेश देण्यात आले आहेत

10:30 Am- शिंदे गटाने हा पक्षादेश धुडकावून लावत नवीन व्हीप जारी केला आहे. शिवसेनेच्या लेटरहेडवर शिंदे गटाने हा व्हीप बजावला असून, यामध्ये भाजप-शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना विजयी करा असा आदेश काढला आहे.

.

Related Stories

मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर अज्ञातांनी फेकल्या पेट्रोलच्या बाटल्या

Archana Banage

देशात 14,256 नवे बाधित

datta jadhav

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

Archana Banage

उमेश कोल्हेंची हत्या नुपूर शर्मांची पोस्ट व्हायरल केल्यानेच

Archana Banage

प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्राद्वारे सुचवल्या 11 उपाययोजना

Tousif Mujawar

आरग-लक्ष्मीवाडीत विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यु

Archana Banage