ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाराष्ट्र एटीएस तपास पथकाकडून राज्यात घातपात घडवण्याच्या उद्देशाने आलेल्या दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन सुरु आहे. अशात महाराष्ट्र एटीएसने काश्मीरमध्ये एक मोठी कारवाई केली आहे. पुण्यातून अटक करण्यात आलेल्या जुनैद (Pune Youth Arrested) या दहशतवाद्याच्या संपर्कातील एका दहशतवाद्यला एटीएसने बेड्या ठोकल्या आहेत. काश्मीरमधून या दहशतवाद्याला अटक करण्यात आली असून तोही जुनैदप्रमाणे लषकर-ए-तोय्यबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra ATS)
अलीकडेच महाराष्ट्र एटीएसने पुण्यातून मोहम्मद जुनैद या दहशतवाद्याला अटक केली होती. पुण्यातील दापोडी परिसरातून त्याला अटक करण्यात आली होती, लष्कर-ए-तोय्यबा या दहशतवादी संघटनेसाठी तो काम करत होता. याच प्रकरणात आता एटीएसने काश्मीरमधून एकाला बेड्या ठोकल्या आहेत. अटकेतील जुनैद हा दहशतवादी या दहशतवाद्याच्या सातत्याने संपर्कात होता.
जुनैद याला अटक करून न्यायालयासमोर हजर केल्यानंतर 3 जूनपर्यंत एटीएस कोठडी (ATS custody) सुनावण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसने पुण्यातल्या दापोडीमध्ये कारवाई करत मोहम्मद जुनैद या 28 वर्षाच्या तरुणाला अटक केली आहे. त्याचा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या संघटनांशी थेट संबंध असल्याचं एटीएसच्या लक्षात आलं. त्याबाबतची माहिती दिल्ली स्पेशल सेलने महाराष्ट्र एटीएसला दिली होती आणि त्यानंतर जुनेद एटीएसच्या रडारवर आला होता.