Tarun Bharat

बारावीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींचीच बाजी; आपल्या जिल्ह्याचा निकाल पहा एका क्लिकवर

Advertisements

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.२१ टक्के लागला असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. मुंबई विभागातील ९०.९१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.३५ टक्के असून, मुलांची टक्केवारी ९३.२९ टक्के आहे. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी २.०६ टक्क्यांनी जास्त आहे. बारावीच्या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना १७ जून रोजी त्यांच्या कॉलेजमध्ये दुपारी तीन वाजल्यापासून गुणपत्रिका मिळणार आहेत.


बारावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे
https://mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
https://hscmahresult.org.in

विभागनिहाय निकालाची टक्केवारी

मुंबई – ९०.९१

कोकण – ९७.२१

पुणे – ९३.६१

नागपूर – ९६.५२

औरंगाबाद – ९४.९७

कोल्हापूर – ९५.०७

अमरावती – ९६.३४

नाशिक – ९५.०३

लातूर – ९५.२५

Related Stories

महाराष्ट्र : मागील 24 तासात 69 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

महाराष्ट्रात पावसाचे धुमशान; मुंबईसह उत्तर कोकणात रेड अलर्ट

Rohan_P

सोलापुरात 40 नवे कोरोनाबाधित रुग्ण, रुग्णांची संख्या 1080 वर

Abhijeet Shinde

काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे शिंदे गटात जाणार?

Abhijeet Shinde

Kolhapur; कानूर खुर्द येथे विधवा महिलेच्या हस्ते ध्वजारोहण

Abhijeet Khandekar

नृसिंहवाडीतील दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली

Kalyani Amanagi
error: Content is protected !!