Tarun Bharat

मुख्य प्रश्नावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचे भाजपचे मोठे षडयंत्र- नाना पटोले

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे नेहमी आपल्या आक्रमक वक्तव्याने चर्चेत असतात. गेले काही दिवस झाले ते महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीवर आणि शरद पवारांवर टीका करत आहेत. आज नाना पटोले यांनी महागाई, बेरोजगारीवरून भाजप भाजपवर टीकास्त्र सोडलं. (Maharashtra Congress President Nana Patole Criticizes Central government)

माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, देशातील सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. रुपयाची दररोज घसरण होत आहे. महागाई व बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. जनतेच्या जीवन मरणाचे प्रश्न असताना धार्मिक मुद्द्यांना पुढे करून वातावरण बिघडवायचे व मुख्य प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचे मोठे षडयंत्र भाजपकडून सुरु आहे, परंतु काँग्रेस जनतेच्या हितासाठी केंद्र सरकारला जाब विचारत राहिल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

“केंद्रातील मोदी सरकार हे सर्व आघाड्यांवर कुचकामी ठरले आहे. महागाई, शेतकरी, कामगार, गरिबांचे केंद्र सरकार प्रश्न सोडवू शकले नाही. काँग्रेस पक्षाला आजच्या परिस्थितीची चिंता वाटते म्हणून जनतेला न्याय कसा मिळेल यासाठी आमची लढाई सुरु आहे. केंद्र सरकारने जनतेला दिलासा देण्याचे निर्णय घेतले पाहिजेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहेत” असा आरोपही पटोलेंनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, “हिंदू धर्माबद्दल आम्हाला दुसऱ्यांकडून शिकण्याची गरज नाही, माणुसकी हा खरा धर्म असून ती जोपासली पाहिजे. जनतेचे प्रश्नच सोडवणार नसले तर ते सरकार काय कामाचे. काँग्रेस पक्षाने सातत्याने जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर संघर्ष केला आहे. आजही आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी केंद्र सरकारविरोधात उभे आहोत”.

देशाच्या तिजोरात सर्वात जास्त पैसा मुंबई, महाराष्ट्रातून जातो पण केंद्र सरकार महाराष्ट्राला निधी देताना मात्र हात आखडता घेते, हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. केंद्र सरकारनेच इंधनावरील करातून २६ लाख कोटी रुपये कमावले आहेत आणि राज्य सरकारने कर कमी करावेत अशी अपेक्षा केंद्र सरकार व भाजपा करत आहे हे अत्यंत चुकीचे आहे”, असा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे.

Related Stories

इचलकरंजी राज्यातील २८ वी महानगरपालिका म्हणून घोषणा

Abhijeet Shinde

उत्तराखंडमध्ये काँग्रेसला झटका

Patil_p

गावठाण मिळकतींचे ड्रोनव्दारे सर्वेक्षण व भूमापन प्रकल्प यशस्वीपणे राबवा

Rohan_P

लग्न सोहळा आटपून परतणारी कार दरीत कोसळून १४ जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

हिमाचल प्रदेश : 7 मे पासून कोरोना कर्फ्यू!

Rohan_P

आईचं दुध विकणारा शिवसेनेत नको; CM ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची ‘ती’ आठवण!

Abhijeet Shinde
error: Content is protected !!