Tarun Bharat

पुढील पाच दिवस महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवरील मच्छीमारांना सर्तकतेचा इशारा

Advertisements

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

गेल्या आठ दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोकण, गोवा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह पश्चिम घाटतही पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे अनेक नद्यांना पूर आला असून गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असून पाऊस सक्रिय झाल्याने कोकणपट्ट्यात अतिवृष्टी होत आहे. दरम्यान पुढील पाच दिवस दक्षिण महाराष्ट्र-गोवा (Maharashtra-Goa)किनार्‍यावर आणि त्याच्या आसपास 60 किमि प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच समुद्राला मोठी भरती येत असल्याने किनाऱ्यावरील नागरिकांना, मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. Maharashtra Goa Rain Update)

दरम्यान आज कर्नाटक किनार्‍यावर वादळी वाऱ्यासह 60 किमी प्रतितास वेगाने पाऊस पडणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे. तसेच 12ते 15 जुलै दरम्यान उत्तर- दक्षिण गुजरात किनारपट्टी आणि ईशान्य अरबी समुद्रावर 65 किमी प्रतितास वेगाने पाऊस पडणार आहे. तसेच पश्चिम मध्य अरबी समुद्राला लागून असलेल्या भागांवर 70 किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.

मालवण ते वसई या कोकण किनारपट्टीवर 3.5 4.4 मीटर उंचीच्या लाटा येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच वेंगुर्ला ते वास्को दरम्यान गोव्याच्या किनारपट्टीवर देखील उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे.

Related Stories

इतक्या उशिरा चौपाटी सुरु करण्यामागचे गौडबंगाल काय?

Patil_p

नवरात्रौत्सवासाठी मुंबई महापालिकेकडून नियमावली जाहीर

Tousif Mujawar

बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला

prashant_c

आमदार शिवेंद्रराजेंसह समर्थकांना जामीन मंजूर

Patil_p

गेट वे ऑफ इंडियावरील आंदोलकांची पोलिसांकडून आझाद मैदानावर रवानगी

prashant_c

पुणे : कोथरूडमध्ये घुसला रानगवा आणि …

Tousif Mujawar
error: Content is protected !!